मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

आधी नवऱ्यानं मग आईनंही घेतला जगाचा निरोप; हताश महिलेनं लेकीसह असा केला आयुष्याचा शेवट

आधी नवऱ्यानं मग आईनंही घेतला जगाचा निरोप; हताश महिलेनं लेकीसह असा केला आयुष्याचा शेवट

एका महिलेनं आपल्या सात वर्षांच्या चिमुकलीसह नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली आहे. (फोटो-लोकमत)

एका महिलेनं आपल्या सात वर्षांच्या चिमुकलीसह नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली आहे. (फोटो-लोकमत)

Suicide in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली या गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी एका महिलेनं आपल्या सात वर्षांच्या चिमुकलीसह नदीपात्रात उडी घेत (Jump into the river) आत्महत्या केली आहे.

    कोडोली, 26 ऑगस्ट: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील कोडोली या गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी एका महिलेनं आपल्या सात वर्षांच्या चिमुकलीसह नदीपात्रात उडी घेत (Jump into the river) आत्महत्या केली आहे. संबंधित घटना मंगळवारी 24 ऑगस्ट रोजी रात्री उशीरा घडली असून बुधवारी सकाळी मायलेकीनं आत्महत्या (Mother and daughter commits suicide) केल्याची घटना उडकीस आली आहे. मायलेकीनं आत्महत्या केल्याची घटना समोर येताच गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची कुरळप पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. रेश्मा अमोल पारगावकर (वय-42) आणि रुदा पारगावकर (वय-7) असं आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावं आहेत. मृत रेश्मा या मंगळवारी रात्री उशीरा आपल्या 7 वर्षाच्या चिमुकलीला घेऊन वारणा नदीच्या दिशेनं गेल्या होत्या. पण वारणा नदीवर असणाऱ्या मच्छिमारानं आणि अन्य एक तरुणानं रेश्मा यांना अपरात्री नदीवर येण्याचं कारण विचारून दोघींना परत पाठवलं होतं. दोघी मायलेकी परत गेल्याही होत्या. हेही वाचा-सुखी संसार लागली नजर, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही मृतदेहाजवळच घेतला गळफास पण रात्री उशीरा दोघी मायलेकी पुन्हा वारणा नदीवर आल्या. यावेळी नदीवर कोणीही नव्हतं. यानंतर रेश्मा यांनी आपल्या 7 वर्षांच्या मुलीसह वारणा नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन पथकाला मिळताच, या पथकानं बोटीच्या साह्यानं नदीपात्रात मायलेकीचा शोध घेतला. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास रेश्मा यांचा मृतदेह आढळला, तर दुपारी चारच्या सुमारास मुलीचा मृतदेहही नदीपात्रात आढळला आहे. दोघा मायलेकींनी अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्यानं गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. हेही वाचा-भयंकर! पैसे देण्यास नकार दिल्यामुळे पर्यटक तरुणीवर सामूहिक बलात्कार खरंतर, रेश्मा यांच्या पतीचं तीन वर्षांपूर्वी एका अपघातात दुर्दैवी निधन झालं होतं. त्यामुळे त्या आपल्या आईसोबत कोडोली याठिकाणी राहत होत्या. परंतु दोन वर्षांपूर्वी आईचंही निधन झालं. त्यानंतर रेश्मा या कोडोली येथील एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होत्या. दरम्यान त्यांनी काही वर्षांपूर्वी रुदाला दत्तक म्हणून घेतलं होतं. पण रुदा वयानं मोठी झाल्यानंतर ती मतिमंद असल्याचं जाणवू लागलं. पतीच्या आणि आईच्या निधनामुळे हताश झालेल्या रेश्मा मुलगी मतिमंद असल्याचं कळल्यानंतर त्या आणखी अस्वस्थ झाल्या. याच कारणातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज गावकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Kolhapur, Suicide

    पुढील बातम्या