मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

अन् संजय दत्त पोहोचला नितीन राऊत यांच्या घरी!

अन् संजय दत्त पोहोचला नितीन राऊत यांच्या घरी!


नितीन राऊत यांच्या मुलगा कुणाल राऊत यांचा फेब्रुवारीमध्ये विवाह सोहळा संपन्न झाला होता.

नितीन राऊत यांच्या मुलगा कुणाल राऊत यांचा फेब्रुवारीमध्ये विवाह सोहळा संपन्न झाला होता.

नितीन राऊत यांच्या मुलगा कुणाल राऊत यांचा फेब्रुवारीमध्ये विवाह सोहळा संपन्न झाला होता.

  • Published by:  sachin Salve
नागपूर, 06 जून : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजूबाबा अर्थात संजय दत्त (Sanjay dutt) याने अचानक काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या घरी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे, नितीन राऊत यांच्या नागपूर (Nagpur) येथील निवास्थानी जाऊन संजय दत्त याने संपुर्ण कुटुंबाची भेट घेतली. नितीन राऊत यांच्या मुलगा कुणाल राऊत यांचा फेब्रुवारीमध्ये विवाह सोहळा संपन्न झाला होता. कोरोना परिस्थितीमुळे स्वागत समारंभ सोहळा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे अनेक मान्यवरांना या सोहळ्याला उपस्थितीत राहता आले नाही. त्यामुळेच संजय दत्त याने नितीन राऊत यांच्या नागपूर येथील निवास्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. कॉर्बेवॅक्सला मान्यता मिळाल्यास देशात उपलब्ध होईल सर्वात स्वस्त लस कुणाल राऊत आणि आकांक्षा या नवदाम्पत्याची भेट घेऊन लग्नाचा शुभेच्छा दिल्या. या भेटीत संजय दत्त याने नितीन राऊत कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.  संजय दत्तची ही भेट अत्यंत गोपनिय अशीच होती. डॉ. नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत यांचा २१ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित  विवाह स्वागत समारंभ कोविड प्रादुर्भावामुळे रद्द झाल्याने त्यावेळेस त्यांना  येणे शक्य झाले नाही. आज त्यांनी नागपूर येथे नवदाम्पत्याची भेट घेऊन कुणाल आणि आकांक्षा यांस विवाह प्रित्यर्थ शुभेच्छा दिल्या. ह्या छोटेखानी भेटीत संजय दत्त यांनी राऊत कुटुंबियांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. एमआरआय स्कॅनमध्ये गर्भाशयातील बाळे कशी दिसतात?मजेशीर VIDEO सोशल मीडियावर व्हायरल संजय दत्त याचे वडील सुनील दत्त हे काँग्रेसचे खासदार राहिले होते. तसंच त्याची मोठी बहिण प्रिया दत्त या सुद्धा खासदार राहिल्या होत्या.
First published:

Tags: Sanjay dutt

पुढील बातम्या