मराठी बातम्या /बातम्या /Viral /

एमआरआय स्कॅनमध्ये गर्भाशयातील बाळे कशी दिसतात?मजेशीर VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

एमआरआय स्कॅनमध्ये गर्भाशयातील बाळे कशी दिसतात?मजेशीर VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

 हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हे फोटो बघून काही नेटीझन्सनी ते भीतीदायक असल्याचं म्हटलं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हे फोटो बघून काही नेटीझन्सनी ते भीतीदायक असल्याचं म्हटलं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हे फोटो बघून काही नेटीझन्सनी ते भीतीदायक असल्याचं म्हटलं आहे.

    आपल्या निरागस चेहऱ्यानं सर्वांचं मन मोहून टाकणारी बाळं (Child) कुणाला आवडत नाहीत? नुकतच जन्मलेलं नवजात अर्भक (New born Babies) असो किंवा थोडं मोठं झालेलं बाळ असो त्याचं गोंडस रूप, निरागस हास्य, गोड आवाज सगळंच कसं अगदी आनंददायी असतं. तासनतास आपण बाळांशी खेळण्यात आपलं मन रमवू शकतो; पण हीच बाळं गर्भाशयात (Womb) असताना त्यांची वाढ योग्य प्रकारे होते की नाही हे तपासण्यासाठी त्यांचं एमआरआय स्कॅन (MRI Scan) केलं जातं तेव्हा किती विचित्र (Creepy), काहीशी भीतीदायकच दिसतात. त्यामुळे बाळांच्या मातांनासुद्धा ते दाखवले जात नाहीत. एका शिकाऊ डॉक्टरने असे काही फोटो एका व्हिडिओद्वारे उघड केले आहेत. टाईम्स नाउ न्यूज डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हे फोटो बघून काही नेटीझन्सनी ते भीतीदायक असल्याचं म्हटलं आहे. बर्‍याच नेटिझन्सनी हे फोटो एखाद्या हॉरर मूव्हीमधील, झोम्बी आणि राक्षसांसारखे वाटत असल्याचं तर काहींनी ते एलियन्ससारखे (Elion) दिसत असल्याचं म्हटलं आहे. तर एकानं चक्क ते मि. बीनसारखे दिसत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एकानं बाळं प्रत्यक्षात अशीच बाहेर आली तर अशी भयप्रद शंका व्यक्त केली आहे. एका महिलेनं मात्र चक्क, ‘वॉव, मला माहित होतं माझ्या पोटात एलियन आहे ते अशी मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. मॅडमेडीसिनमध्ये काम करणाऱ्या या शिकाऊ डॉक्टरने हे फोटो शेअर करताना, ‘वैद्यकशास्त्र शिकताना मी पाहिलेली सर्वात भयानक आणि मजेदार गोष्ट’ असं वर्णन केलं आहे. बाळं जेव्हा आईच्या गर्भात असतात तेव्हा ती खरोखरच विचित्र दिसतात, असंही त्यानं म्हटलं आहे. हे ही वाचा-सर्वसामान्यांसारखा रस्ता ओलांडत होता तरुण; 23 सेंकदाच्या VIDEO नंतर ठरला हिरो एखादी स्त्री गर्भवती (Pregnant) असते तेव्हा टप्प्याटप्प्यानं गर्भातील बाळाची वाढ योग्यरीतीनं होतं असल्याची खात्री करण्याकरता सोनोग्राफी , एमआरआय स्कॅनसारख्या तपासण्या केल्या जातात. सोनोग्राफीमध्ये (Sonography) बाळाचे आकारमान, गर्भाशयाची स्थिती इत्यादी गोष्टी दिसतात. स्क्रीनवर दिसणारे चित्र गर्भवती महिलांनाही दाखवले जाते. पण एमआरआय स्कॅनचे फोटो मात्र दाखवले जात नाहीत. याचं कारण या व्हिडिओमुळं उघड झालं आहे. एमआरआय स्कॅनमध्ये दिसणारे फोटो पाहिले तर लक्षात येईल, की हे फोटो मानवी कवटीचे फोटो असतात तसे दिसतात. हाडांची रचना यात उठून दिसते, एका छोट्याशा डोक्यावर असणारे डोळे आपल्याकडे रोखून बघत आहेत, असं वाटतं. हे फोटो काहींना मजेशीर वाटत असले तरी ते भीतीदायकच अधिक दिसतात त्यामुळेच हे फोटो आईला दाखवले जात नाहीत, कोणत्याही आईला आपल्या बाळाचे असे फोटो बघण्याची उत्सुकता असेल वाटत नाही, असं त्या डॉक्टरनंही स्पष्ट केलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या