मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona Vaccine : कॉर्बेवॅक्सला मान्यता मिळाल्यास देशात उपलब्ध होईल सर्वात स्वस्त लस

Corona Vaccine : कॉर्बेवॅक्सला मान्यता मिळाल्यास देशात उपलब्ध होईल सर्वात स्वस्त लस

बॉयोलॉजिकल ई कंपनीची (Biological E) लस कॉर्बेवॅक्सला (Corbevax) परवानगी मिळाली तर ही देशातंर्गत उपलब्ध होणारी सर्वात स्वस्त लस असेल.

बॉयोलॉजिकल ई कंपनीची (Biological E) लस कॉर्बेवॅक्सला (Corbevax) परवानगी मिळाली तर ही देशातंर्गत उपलब्ध होणारी सर्वात स्वस्त लस असेल.

बॉयोलॉजिकल ई कंपनीची (Biological E) लस कॉर्बेवॅक्सला (Corbevax) परवानगी मिळाली तर ही देशातंर्गत उपलब्ध होणारी सर्वात स्वस्त लस असेल.

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 6 जून : देश कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहे. या लाटेत सातत्याने वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली होती. सध्या काही अंशी रुग्णसंख्येत घट होताना दिसत असून, स्थिती पूर्ववत होण्याकडे अल्पशी वाटचाल सुरु झाली आहे. मात्र सर्व स्थिती सरकार आणि नागरिकांचा भर हा लसीकरणावर (Vaccination) आहे. मात्र आता लसीकरण अभियान काहीसे विस्कळीत आहे. लसीचा अपुरा पुरवठा, काही तांत्रिक अडचणी याला कारणीभूत आहेत. त्यातच लसींचे दर (Vaccine Price) हा देखील कळीचा मुद्दा ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. बॉयोलॉजिकल ई कंपनीची (Biological E) लस कॉर्बेवॅक्सला (Corbevax) परवानगी मिळाली तर ही देशातंर्गत उपलब्ध होणारी सर्वात स्वस्त लस असेल. बायोलॉजिकल ईच्या कॉर्बेवॅक्सला जर मंजुरी मिळाली तर ही देशातील सर्वात स्वस्त लस ठरणार आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, कॉर्बोवॅक्स लसीच्या 2 डोसेसची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. बायोलॉजिकल ईच्या व्यवस्थापकीय संचालक महिला दताला यांनी एका मुलाखतीत याबाबत संकेत दिले होते.परंतु, अंतिम किंमत ठरवणं अजून बाकी आहे. कॉर्बोवॅक्स लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल (Trials) सध्या सुरू असून, तिचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. एसआय़आय़च्या कोविशिल्ड (Covishild) लसीची किंमत राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये 300 रुपये प्रतिडोस आणि खासगी रुग्णांलयांमध्ये 600 रुपये प्रतिडोस अशी आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन (Covaccine) लसीच्या एका डोसची किंमत 400 रुपये तर खासगी रुग्णालयांमध्ये 1200 रुपये आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि रशियाच्या स्फुटनिक व्ही (Sputnik V) या लसीच्या प्रतिडोसची किंमत 995 रुपये असून ही लस केवळ शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्येच दिली जात आहे. हे ही वाचा-'रेल्वे प्रवासासाठी बनावट ओळखपत्र मिळेल'; पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्याचा प्रताप कॉर्बोवॅक्सचे उत्पादन सुरु टिव्ही 9 च्या वृत्तानुसार, बायोलॉजिकल ई रिसेप्टर बाईडींग डोमेन (RBD) प्रोटीन लसीसाठी बीसीएमचे सहकार्य घेत आहे. बायोलॉजिकल ईने मागील 2 महिन्यांपासून लस उत्पादन सुरु केले आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनी 75 ते 80 डोसेजचे उत्पादन करु शकेल, असा विश्वास दताला यांनी व्यक्त केला आहे. जर या लसीला जुलैपर्यंत ईयुए (EUA) मिळाला तर लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. 30 कोटी लसीचे आगाऊ बुकींग लसीचे सकारात्मक परिणाम पाहता केंद्र सरकारने 30 कोटी लस डोसचे आगाऊ बुकींग केले आहे. यासाठी केंद्र सरकारने 50 रुपये प्रतिडोस प्रमाणे 1500 कोटी रुपये कंपनीला दिले आहेत. कॉर्बोवॅक्स लसीची किंमत ठरवण्याच्या रणनितीचा सर्वात पहिला संकेत टेक्सास येथील बायलर कॉलेज ऑफ मेडिसीन (BCM) मधील नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनच्या असोसिएट डिन डॉ. मारिया एलेना यांनी दिला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, हिपॅटायटस बी साठीची लस आणि पारंपारिक तंत्राचा वापर करुन केवळ 1.5 डॉलर (सुमारे 110 रुपये) प्रति डोस या हिशोबानुसार या लसीचे उत्पादन केले जाऊ शकते.
First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या