नागपूर, 18 मे : नागपूर शहरात एका सेक्स रॅकेटचा (Prostitution Racket) पदर्फाश करण्यात आला आहे. हुडकेश्वर पोलीस ठाणे परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (Crime Branch Social Security Team) या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. विशेष म्हणजे, चक्क एक पेन्शनर महिला हे सेक्स रॅकेट चालवायची, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Pensioner Woman Prostitution Racket Nagpur) रेखा उर्फ अनिता पाचपोर असे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी केलेल्या या कारवाई दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर सूत्रधार महिलेला अटक करण्यात आली आहे. आोपी महिला ही नियमित पतीची पेन्शनही घेत होती, अशी माहिती समोर आली आहे. रेखा उर्फ अनिता पाचपोर ही महिला सेक्स रॅकेट चालवत होती. नरसाळा मार्ग येथील संत ज्ञानेश्वर नगरात हा धक्कादायक प्रकार सुरू होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी लगेचच कारवाई केली.
पोलिसांनी एक सापळा रचला. तसेच खोटा ग्राहक त्याठिकाणी पाठवला. हा ग्राहक त्याठिकाणी पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की ही माहिती खरी आहे, त्यानंतर पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्याठिकाणी लगेचच छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे. तर सूत्रधार महिला रेखा उर्फ अनिता पाचपोर हिला अटक करण्यात आली आहे. रेखाला यापूर्वीदेखील अशाच प्रकारात पकडण्यात आले होते. गरजू आणि गरीब महिला तसेच मुलींना ती आपल्या जाळ्यात ओढायची. यानंतर देहव्यापारात ढकलायची. ग्राहकांकडून मिळणाऱ्या रकमेपैकी निम्मी रक्कम रेखा ही देहव्यापार करण्याऱ्या महिलांना देत असे.
हेही वाचा - आर्थर रोड जेलमध्ये महिला कैदीसोबत भयंकर कृत्य, वाचून तुम्हच्याही अंगावर येतील शहारे
सेक्स रॅकेट चालवणारी रेखा नावाची महिला ही मूळची अमरावतीची असल्याची माहिती समोर आली आहे. तिला पतीची पेन्शनही मिळते. तसेच तिला एक मुलगा आणि मुलगी आहेत. मुलगा आणि मुलीचे लग्न झाल्यामुळे ते दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्यामुळे रेखा ही घरी एकटीच राहत होती. तिचा घरीच हा सर्व प्रकार चालायचा. यावेळी पोलिसांनी 27 आणि 45 वर्षीय अशा दोन महिलांची सुटका केली आहे. दोन्हीही महिला विधवा आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Nagpur News, Police, Sex racket