मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /आर्थर रोड जेलमध्ये महिला कैदीसोबत भयंकर कृत्य, वाचून तुम्हच्याही अंगावर येतील शहारे

आर्थर रोड जेलमध्ये महिला कैदीसोबत भयंकर कृत्य, वाचून तुम्हच्याही अंगावर येतील शहारे

आर्थर रोड कारागृहातून (Arthur Road Jail) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आर्थर रोड कारागृहात अनैसर्गिक लैंगिक संबंध (Unnatural Sex) ठेवल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलिसांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 17 मे : आर्थर रोड कारागृहातून (Arthur Road Jail) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आर्थर रोड कारागृहात अनैसर्गिक लैंगिक संबंध (Unnatural Sex) ठेवल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलिसांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद इरशाद इस्लाम शेख असे आरोपीचे नाव आहे. तो गोवंडी येथील रहिवासी आहे.

अशी आली घटना समोर - 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे आर्थर रोड कारागृहातील सर्कल क्रमांक 1 मधील बॅरेक क्रमांक 7 मध्ये ही घटना घडली. आर्थर रोड कारागृहाच्या अधीक्षकांची तक्रार पोलिसांना मिळाली होती. यामध्ये पोलिसांना कारागृहात लैंगिक शोषणाच्या कथित घटनेची चौकशी करण्यास सांगितले होते. पीडित मुलगी हरी ओशिवरा येथील रहिवाशी आहे. एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांनी तुरुंगाचा दौरा केला. त्यावेळी पीडितेचा जबाब नोंदवला. ती मागील काही दिवसांपासून तुरुंगात आहे.

आरोपी मोहम्मद इरशाद इस्लाम शेख हा बॅरेक क्रमांक सातमध्ये होता. त्याने पहाटे 2 ते 2.30 च्या दरम्यान पीडितेला जोरदार मारहाण केली आणि तिला अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, अशी माहिती पीडितेची चौकशी करताना समोर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - Aurangabad Crime: महाविद्यालयीन तरुणीवर कारमध्ये बलात्कार, VIDEO व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार

आणखी कुणासोबत असं घडलं का?

इतके नव्हे तर आरोपीने पीडितेला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली आहे. पीडितेने कारागृह प्रशासनाला याची माहिती दिली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 377, 323 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कैदी न्यायालयीन कोठडीत असल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळाली आहे. आरोपींनी आणखी काही कैद्यांसोबत असेच गुन्हेगारी कृत्य केले होते किंवा करण्याचा प्रयत्न केला होता का, याचाही आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलिसांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Police, Sexual harassment