Home /News /nagpur /

Nitin raut म्हणतात, नागपूर जिल्ह्याला खरीप हंगामासाठी मुबलक रासायनिक खते देणार

Nitin raut म्हणतात, नागपूर जिल्ह्याला खरीप हंगामासाठी मुबलक रासायनिक खते देणार

रासायनिक खतांच्या (fertilizer) उपलब्धतेचा फटका शेतकऱ्यांना (farmers) बसू नये, यासाठी शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्याची सूचना डॉ. नितीन राऊत (minister nitin raut) यांनी दिली आहे.

  नागपूर 10 मे : राज्यात विजेचा तुटवडा जाणवू नये यासाठी उर्जामंत्री नितीन राऊत वांरवार बैठक घेऊन खुलासा करत आहेत. दरम्यान राज्यासोबत आपल्या जिल्ह्यात खतांचा तुटवडा जाणवू नये यासाठी त्यांनी खबरदारी घेतली आहे. युक्रेन रशिया युद्धाचा रासायनिक खतांच्या (fertilizer) उपलब्धतेवर परिणाम होऊ नये व त्याचा फटका शेतकऱ्यांना (farmers) बसू नये, यासाठी उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्याची सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (minister nitin raut) यांनी खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत केली. या बैठकीमध्ये सर्वप्रथम हवामान खात्याचा (imd report) अंदाज वर्तविण्यात आला. केंद्रीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस (rain alert) राहणार आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पीक पेऱ्याचे नियोजन करण्याची सूचना मंत्री राऊत यांनी केल्या. हे ही वाचा : गोल्डन चान्स! MahaGenco मध्ये तब्बल 2,28,745.रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी लगेच करा अप्लाय नागपूर जिल्ह्यात ४ लाख, ७४ हजार ३२५ हेक्टर क्षेत्रांमध्ये विविध पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे कापूस लागवडीखाली येते.गेल्यावर्षी दोन लक्ष हेक्टरवर पऱ्हाटीची लागवड करण्यात आली होती. त्याखालोखाल एक लक्ष दहा हजार हेक्टरवर सोयाबीन लागवडीखाली होते. त्यापाठोपाठ भाताची व तुरीची लागवड खरीप हंगामात केली जाते. त्यामुळे यावर्षी सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना आपापल्या क्षेत्रातील पीक लागवडी बाबत उद्दिष्ट लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. गेल्या तीन वर्षात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत आहे. या वर्षीदेखील हवामान खात्याचा अंदाज पावसाचा आहे. त्यामुळे खरिपासाठी कर्ज वाटप करताना बँकांनी आपले उद्दिष्ट पूर्ण करावे, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण १ लक्ष ५० हजार लक्ष कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. आत्तापर्यंत १ हजार ७२९ लक्ष कर्जवाटप झाले आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी आवाहन केले. हे ही वाचा : Pune : पुणे विमानतळावर घुसखोरीचा प्रयत्न, आरोपींकडे बनावट तिकीटे, कट की आणखी दुसरं काही? नैसर्गिक संकटामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देण्याबाबत तालुका स्तरावर विमा कंपन्यांचे कार्यालय उघडण्यात आले आहे. या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना आपले कार्यालय कुठे आहे,त्याची माहिती द्यावी. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर ७२ तासाच्या आत विमा कंपन्यांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. त्यामुळे तातडीच्या संपर्क व्यवस्थेसाठी हा समन्वय ठेवावा तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीनाही याची माहिती द्यावी, अशी सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केली. या बैठकीत पीक निहाय बियाणे गरज,  मागणी, बियाणे उगवण क्षमता, कमी खताचा पुरवठा झाल्यास करावयाचे उपाय योजना, युरिया बाबतची सद्यस्थिती, महाबीटी, मधील प्राप्त अर्ज, प्रधानमंत्री पिक विमा योजना, खरीप व रब्बी हंगामातील नियोजन, गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना, मागील तीन वर्षातील कर्जवाटप, तसेच जिल्ह्यातील कृषी विभागातील मंजूर व भरलेल्या पदांचा आढावा घेण्यात आला.

  तुमच्या शहरातून (नागपूर)

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Nagpur, Nagpur News, Nitin, Nitin raut

  पुढील बातम्या