Home /News /pune /

Pune : पुणे विमानतळावर घुसखोरीचा प्रयत्न, आरोपींकडे बनावट तिकीटे, कट की आणखी दुसरं काही?

Pune : पुणे विमानतळावर घुसखोरीचा प्रयत्न, आरोपींकडे बनावट तिकीटे, कट की आणखी दुसरं काही?

पुणे विमातळावर दोन जणांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींकडे बनावट तिकीटे होती. ते जयपूरला जाणार होते.

    पुणे, 10 एप्रिल : पुण्यातून (Pune) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे विमातळावर (Pune Airport) दोन जणांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींकडे बनावट तिकीटे होती. ते जयपूरला (Jaipur) जाणार होते. पण सुरक्षा यंत्रणांनी वेळीच आरोपींना हेरलं. त्यांची झडती घेतली असता आरोपींकडे बनावट तिकीटे सापडली. त्यामुळे पुणे पोलिसांनी (Pune Police) पुणे विमानतळात (Pune Airport) घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पुणे विमानतळावर अशाप्रकारे घुसखोरी कशी कोणी करु शकतो? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. आरोपींचा यामागे नेमका काय उद्देश होता ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे. आरोपींना अशाप्रकारे घुसखोरी करुन नेमकं काय साध्य करायचं होतं ते लवकरच समोर येईल, अशी आशा वर्तवली जात आहे. या प्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाने तक्रार दिली आहे. सुरक्षा यंत्रणांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी आता या वृत्ताला दुजारो दिला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम शिंदे आणि मोहम्मद देसाई अशी या दोघांची नावे आहेत. यापैकी एकजण उडन टेकडी भागात राहतो. तर दुसरा कोंढवा भागात राहतो. दोघेही एअर एशियन विमान कंपनीच्या विमानातून जयपूरकडे जात होते. त्यावेळी संबंधित प्रकार सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात आला. (सत्तेसाठी कायपण! काँग्रेस आणि भाजपची युती अन् राष्ट्रवादी विरोधी बाकावर) आरोपी हे अनधिकृतपणे विमानतळात घुसले. तसेच त्यांच्याकडे जे तिकीट होतं ते बनावट होते. त्यामुळे या दोघांची एवढ्या तातडीच्या प्रवासाची काय गरज होती? त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? तसेच त्यांनी याआधीदेखील असा प्रवास केला का? या सगळ्याचा तपास विमानतळ पोलीस करत आहेत. पण अशाप्रकारे पुणे विमानतळावरील घुसरीखोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, आरोपींनी अशाप्रकारे तिकीट मिळवण्यासाठी कोणती यंत्रणा वापरली, याचा शोध घेणे पोलिसांपुढील मोठे आव्हान आहे. विमानतळावर बनावट तिकीटाने प्रवास करणे किंवा आणखी काही गैरप्रकाराच्या घटना आपण चित्रपटांमध्ये पाहिल्या आहेत. विमान हे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सर्वात सोयीचं माध्यम आहे. विमान वाहतुकीच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागतात. पण याच वाहतुकीचा वापर काहीजण अनैतिक गोष्टींसाठी करतात. त्याचा प्रत्यय याआधी बऱ्याचदा समोर आला आहे. काहीजण विमानाने प्रवास करताना सोबत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज बाळगतात. तर काहीजण वेगवेगळ्या पदार्थांचा काळा बाजार करतात. अर्थात विमानतळावर असलेली सुरक्षा यंत्रणा अशा आरोपींना वेळीच ठेचते. पण या यंत्रणेच्या नजरेतून सर्वचजण पकडले गेले असतील याची शाश्वती निश्चितच नाही.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या