• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • mahresult.nic.in: SSC Result Maharashtra राज्यातील तब्बल 4 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांची माहिती

mahresult.nic.in: SSC Result Maharashtra राज्यातील तब्बल 4 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांची माहिती

Maharashtra Board Result 2021 declared: शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील निकालासंदर्भातली माहिती दिली आहे. यावेळी पाटील यांनी एक मोठी अपडेट दिली आहे.

  • Share this:
    पुणे, 16 जुलै: दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra 10th result) झाला आहे. नुकतीच शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील निकालासंदर्भातली माहिती दिली आहे. यावेळी पाटील यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. राज्यातील तब्बल 4 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव आहेत. (Maharashtra SSC result 2021) राज्यातील 4922 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. काही शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन गुण पाठवले नसल्यानं त्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी ही माहिती दिली आहे. (mahresult.nic.in) यंदाची निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर जिल्ह्याचा लागला आहे. नागपूर विभागाचा 99.55 टक्के आहे. पूर्नपरिक्षर्थी निकालाची टक्केवारी 90.85 इतकी आहे. 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. निकालात पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनी पुन्हा अव्वल असून मुलींच्या निकालाची टक्केवारी 99.96% इतकी आहे. मुलांची टक्केवारी 99.94% असून राज्यातील 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 % लागला आहे. हेही वाचा- Big Breaking News:  दहावीचा निकाल अखेर जाहीर, कोकण विभागाचा 100 टक्के निकाल असा तपासा 10 वीचा निकाल निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in जा SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाइप करा. सीट नंबर स्पेसशिवाय टाइप करा. आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका. लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला तो निकाल डाऊनलोड करता येणार आहे. विद्यार्थी संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउटही काढू शकणार आहेत. हेही वाचा- मुंबईत पावसाचं थैमान, लोकल रेल्वेचे Current Status जाणून घ्या विभागानुसार दहावीच्या निकालाची टक्केवारी कोकण विभागाचा निकाल 100 पुणे विभागाचा निकाल 99.96 टक्के नागपूर विभागाचा निकाल 99.84 टक्के औरंगाबाद विभागाचा निकाल 99.96 टक्के मुंबई विभागाचा निकाल 99.96 टक्के कोल्हापूर विभागाचा निकाल 99.92 टक्के अमरावती विभागाचा निकाल 99.98 टक्के नाशिक विभागाचा निकाल 99.96 टक्के लातूर विभागाचा निकाल 99.96 टक्के नागपूर विभागाचा निकाल 99.84
    Published by:Pooja Vichare
    First published: