पुणे, 16 जुलै: दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra 10th result) झाला आहे. कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेच्या (Second Wave) प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा (Maharashtra 10th result) होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. (SSC result 2021 Maharashtra Board ) शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील निकालासंदर्भातली माहिती दिली आहे. राज्याचा दहावीचा एकूण निकाल 99.95 टक्के लागला असून यंदाचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा 4.65 टक्के अधिक आहे. दहावीचे 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. राज्यातील 22,384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 99.84 टक्के लागला आहे. मोठी बातमी: तब्बल 4 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव, हे आहे कारण विभागानुसार दहावीच्या निकालाची टक्केवारी कोकण विभागाचा निकाल 100 पुणे विभागाचा निकाल 99.96 टक्के नागपूर विभागाचा निकाल 99.84 टक्के औरंगाबाद विभागाचा निकाल 99.96 टक्के मुंबई विभागाचा निकाल 99.96 टक्के कोल्हापूर विभागाचा निकाल 99.92 टक्के अमरावती विभागाचा निकाल 99.98 टक्के नाशिक विभागाचा निकाल 99.96 टक्के लातूर विभागाचा निकाल 99.96 टक्के नागपूर विभागाचा निकाल 99.84 यंदाही दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी 99.96 टक्के आहे. तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 99.94 टक्के इतकी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के लागला आहे. आज एक वाजता या वेबसाईटवर बघता येईल दहावीचा निकाल असा तपासा 10 वीचा निकाल निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in जा SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाइप करा. सीट नंबर स्पेसशिवाय टाइप करा. आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका. लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला तो निकाल डाऊनलोड करता येणार आहे. विद्यार्थी संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउटही काढू शकणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.