मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

दगडाने ठेचून युवकाची हत्या; 10 दिवसांतील दुसरी घटना, नागपुरात खळबळ

दगडाने ठेचून युवकाची हत्या; 10 दिवसांतील दुसरी घटना, नागपुरात खळबळ

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime News : दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना नागपुरात घडली आहे.

  • Published by:  Sunil Desale

नागपूर, 13 नोव्हेंबर : नागपुरातील गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. गेल्या 10 दिवसांत दोघांची दगडाने ठेचून हत्या (man killed by smashing head with stone) करण्यात आल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नागपूर एमआयडीसी (Nagpur MIDC) परिसरात गुरुवारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या (murder) करण्यात आली होती. मृतकाचे नाव संजयसिंग गौर असे असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजयसिंग गौर हे आयकॉन इंडस्ट्रिज येथे काम करत होते. संजयसिंग यांचे मामा बालाघाट येथे राहतात. 10 नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरी वास्तू पूजा होती. त्यासाठी संजयसिंग हे आपल्या मामाच्या घरी गेले होते. त्यानंतर सायंकाळी संजयसिंग हे आपल्या घराकडे पुन्हा निघाले मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूर एमआयडीसी परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला.

संजयसिंग यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली होती त्यामुळे ओळख पटवणं अवघड जात होतो. संजयसिंग यांच्याकडील कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. दरम्यान, त्यांची हत्या का आणि कुणी केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. याप्रकरणी नागपूर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

वाचा : पती गळफास घेत होता अन् पत्नी राहिली बघतच; नागपुरातील विचित्र घटना

या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीसीटीव्हीत संशयित आरोपी कैद झाले आहेत आणि त्या सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलीस आपला तपास करत आहेत.

10 दिवसांत दुसरी दगडाने ठेचून हत्या

एका टोळक्यासोबत झालेल्या वादानंतर गुंडाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या गुंडाचे नाव फ्रँक अँथनी असल्याची माहिती समोर आली आहे. फ्रँक हा नागपुरातील कुख्यात गुंड होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात हत्येचे गुन्हे दाखल होते.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गुंड फ्रँक अँथनी आपल्या कुटुंबासोबत सासुरवाडीला गेला होता. सासुरवाडीहून आपल्या घरी निघाल्यावर वाटेत काही दारुड्यांमध्ये वाद सुरू असल्याचं त्याने पाहिलं. यावेळी फ्रँक अँथनी हा वाद पाहण्यासाठी थांबला असता दारूच्या नशेत असलेल्या टोळक्याने त्याला जाब विचारला.

दारूच्या नशेत असलेल्या टोळक्यातील एकाने फ्रँक अँथनी याला क्या देख रहा है असं विचारलं. यानंतर संतापलेल्या फ्रँक अँथनी याने त्या टोळक्याकडे रागाने पाहत म्हटलं मुझे पहचानता नही क्या? असा प्रश्न विचारत फ्रँक याने त्या टोळक्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आपल्याला होत असलेली शिवीगाळ पाहून टोळक्याने फ्रँक अँथनी याच्यावर हल्ला चढवला. दारूच्या नशेत असलेल्या या टोळक्याने फ्रँक अँथनीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर त्यांनी शेजारील दगडाने ठेचून फ्रँक अँथनी याची हत्या केली.

First published:

Tags: Crime, Murder, Nagpur