पती गळफास घेत होता अन् पत्नी राहिली बघतच; नागपुरातील विचित्र घटना

पती गळफास घेत होता अन् पत्नी राहिली बघतच; नागपुरातील विचित्र घटना

Suicide in Nagpur: नागपुरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या डोळ्यादेखत आत्महत्या (husband commits suicide in front of wife) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

नागपूर, 08 नोव्हेंबर: नागपुरात (Nagpur) एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या डोळ्यादेखत आत्महत्या (husband commits suicide in front of wife) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीसोबत कौटुंबीक वाद (Family disputes) झाल्यानंतर, मृत पती गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट करत होता, त्यामुळे पत्नी पतीकडे पाहतच राहिली आहे. यानंतर पत्नीने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावून पतीला रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल करताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं आहे. बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

टिकाराम गोकुल अरखेल असं आत्महत्या केलेल्या 54 वर्षीय पतीचं नाव असून ते वर्धा मार्गावरील सीआयसीआर क्वॉर्टरमध्ये वास्तव्याला होते. मृत अरखेल हे केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्रात चतुर्थश्रेणी कर्मचारी होते. रविवारी सकाळी आपल्या पत्नीच्या डोळ्यादेखत त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. अरखेल यांच्या आत्महत्येची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा-प्लॉट व्यावसायिकाच्या हत्येचं उलगडलं गूढ; लेकच निघाला खुनी, धक्कादायक कारण समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अरखेल यांचा आपल्या पत्नीसोबत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणातून वाद व्हायचा. काही दिवसांपूर्वी त्यांचा एका नातेवाईक महिलेशी वाद झाला होता. त्यामुळे संबंधित महिलेनं बेलतरोडी पोलीस ठाण्यात अरखेल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्यामुळे मागील काही दिवसांपासून अरखेल तणावात होते.दरम्यान, रविवारी टिकाराम अरखेल यांचा आपल्या पत्नीसोबत किरकोळ कारणातून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर अरखेल यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

हेही वाचा-बापाच्या डोळ्यादेखत चिमुकलीनं तडफडून सोडला प्राण;सोलापुरातील हृदय पिळवटणारी घटना

विशेष म्हणजे यावेळी अरखेल यांची पत्नी घरातच होती. आत्महत्या केल्यानंतर पत्नीने आरडाओरड करून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावलं. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अरखेल यांच्या गळ्याभोवतची फास काढत त्यांना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याठिकाणी जाताच डॉक्टरांनी अरखेल यांना मृत घोषित केलं आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा अधिक तपास बेलतरोडी पोलीस करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: November 8, 2021, 3:53 PM IST

ताज्या बातम्या