Nagpur : 'मुझे पहचानता नही क्या' विचारणाऱ्या कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून हत्या, नागपुरातील घटना

Nagpur : 'मुझे पहचानता नही क्या' विचारणाऱ्या कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून हत्या, नागपुरातील घटना

Nagpur Crime News: नागपुरातील कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली आहे. दारूच्या नशेत असलेल्या टोळक्याने त्याचा खात्मा केला आहे.

  • Share this:

नागपूर, 4 नोव्हेंबर : नागपुरातील (Nagpur) कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून हत्या (Group of people smash head of goon with stone) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका टोळक्यासोबत झालेल्या वादानंतर गुंडाची हत्या करण्यात आली आहे. या गुंडाचे नाव फ्रँक अँथनी असल्याची माहिती समोर आली आहे. फ्रँक हा नागपुरातील कुख्यात गुंड होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात हत्येचे गुन्हे दाखल होते.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गुंड फ्रँक अँथनी आपल्या कुटुंबासोबत सासुरवाडीला गेला होता. सासुरवाडीहून आपल्या घरी निघाल्यावर वाटेत काही दारुड्यांमध्ये वाद सुरू असल्याचं त्याने पाहिलं. यावेळी फ्रँक अँथनी हा वाद पाहण्यासाठी थांबला असता दारूच्या नशेत असलेल्या टोळक्याने त्याला जाब विचारला.

वाचा : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला FB मित्राने मुलाखतीच्या नावाने बोलावलं आणि केला बलात्कार

दारूच्या नशेत असलेल्या टोळक्यातील एकाने फ्रँक अँथनी याला क्या देख रहा है असं विचारलं. यानंतर संतापलेल्या फ्रँक अँथनी याने त्या टोळक्याकडे रागाने पाहत म्हटलं मुझे पहचानता नही क्या? असा प्रश्न विचारत फ्रँक याने त्या टोळक्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आपल्याला होत असलेली शिवीगाळ पाहून टोळक्याने फ्रँक अँथनी याच्यावर हल्ला चढवला.

दारूच्या नशेत असलेल्या या टोळक्याने फ्रँक अँथनीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर त्यांनी शेजारील दगडाने ठेचून फ्रँक अँथनी याची हत्या केली. या हल्ल्यात गुंड फ्रँक याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास करुन संशयितांना ताब्यत घेतले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आधी पार्टी केली मग कुदळ मारून मित्राचा काढला काटा

दुसऱ्या एका घटनेत गुरुवारी रात्री नागपुरात एका तरुणाने आपल्या मित्रांची निर्घृण पद्धतीने हत्या केली आहे. आरोपी तरुणाने दारूपार्टी केल्यानंतर आपल्या मित्रावर कुदळने जबरी वार करत त्याची हत्या केली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी एका दुकानासमोर मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

कमलेश गिरडे असं हत्या झालेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव असून तो पारडी परिसरातील एकता नगर येथील रहिवासी आहे. मृत कमलेश हा मजूर असून तो मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. तो अनेकदा आपल्या घरी जायचा नाही. बाहेरच मिळेल तिथे मुक्काम ठोकायचा. दरम्यान, गुरुवारी नेहमीप्रमाणे तो कामासाठी घरातून बाहेर गेला. नागपुरातील महाल परिसरातील एका बांधकामाच्या इमारतीवर तो कामासाठी गेला होता.

Published by: Sunil Desale
First published: November 4, 2021, 10:27 AM IST

ताज्या बातम्या