मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

नागपूरमध्ये पुन्हा Gangwar, डोक्यात दगड घालून गुंडाला ठार मारले

नागपूरमध्ये पुन्हा Gangwar, डोक्यात दगड घालून गुंडाला ठार मारले

 ही घटना रात्री 10 वाजेच्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडली.

ही घटना रात्री 10 वाजेच्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडली.

ही घटना रात्री 10 वाजेच्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडली.

नागपूर, 08 जुलै: नागपूरमध्ये (Nagpur) गुन्हेगारी घटनाचं सत्र सुरूच आहे. शहरातील पांढराबोडी भागात एक गुंडाची  दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या (murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गँगवार (gangwar) मधूनही ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 10 वाजेच्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडली. अक्षय जयपूर (Akshya Jaypur) असं मृतकचे नाव आहे. अक्षय हा गुन्हेगार होता. त्याच्यावर हत्या आणि हत्येचा प्रयत्न व इतर गंभीर गुन्हे दाखल होते. सहा महिन्याआधीच तो जेलमधून बाहेर आला होता.

राजीव गांधींच्या पुतळ्यावर पेट्रोल फेकून लावली आग, व्हायरल VIDEO नंतर कारवाई

बुधवारी रात्री अक्षय हा पांढराबोडी परिसरात आल्याची माहिती आरोपांना मिळाली होती. त्यानंतर चौघांनी जाऊन अक्षयला घेरले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर डोक्यात दगड घालून पळून गेले. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे अक्षयचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. अवैध दारूविक्रीच्या वादातून प्रतिस्पर्धी टोळीने अक्षयची हत्या केल्याचे प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून इतर आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलीस मारहाणीत वाहनचालकाचा मृत्यू

तर, मद्यपी वाहन चालकांच्या दुचाकीची पोलीस वाहनाला धडक बसल्यानंतर पोलिसांनी मद्यपीला केलेल्या जबर मारहाणीत मनोज ठवकर या वाहन चालकाचा मृत्यू झाला. नागपूरच्या पारडी भागत रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

Online Classमध्ये कपलचं सेक्स; कॅमेरा सुरू राहिल्याने शिक्षकांनी पाहिलं आणि....

जखमी अवस्थेत असतांना पोलिसांनी मनोज ठवकरला  भवानी हॉस्पिटलमध्ये भरती केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यांनतर मृतकच्या नातेवाईकांनी व स्थानिकांनी हॉस्पिटलमध्ये जमून पोलिसांच्या विरोधात जोरात नारेबाजी केली. प्रकरण संवेदनशील असल्याने वरिष्ठ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

First published:

Tags: Gang of goons, Murder, Nagpur, Pune gangwar cctv, Shocking news, नागपूर