लुधियाना, 08 जुलै: माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा पुतळा जाळल्याची घटना घडली आहे. राजीव गांधींच्या पुतळ्यावर पेट्रोल (Petrol) टाकून तो जाळण्यात (Fire) आला आहे. लुधियानामधील (Ludhiana) सलेम टाबरी पार्कमध्ये ही घटना घडली. या घटनेप्रकरणी दोन जणांचा अटक करण्यात आली आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच रमनदीप सिंह मंगू मठनं या घटनेची जबाबदारी घेतली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. बोहरा गावचा रहिवासी मुख्य आरोपी रमनदीप सिंह मंगू मठ आणि पीरुबंदा येथे राहणारा त्याचा साथीदार सतपाल नवी याला अटक केली आहे. रमनदीप आणि त्याचा साथीदार सतपाल राजीव गांधींच्या पुतळ्यावर पेट्रोल टाकून नंतर त्याला आग लावतात, असं व्हायरल झालेल्या व्हिडिओत आहे. तसंच या व्हिडिओ असंही ऐकायला मिळत आहे की, कॉंग्रेसचे स्थानिक नेते गुरसिमरन सिंग मंडच्या घोषणेला उत्तर दिलं असल्याचं रमनदीप म्हणाला आहे. गुरसिमरन यांनी आपण शहरात राजीव गांधींचे अधिक पुतळे बसवणार असल्याची घोषणा केली होती. हेही वाचा- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पंतप्रधान मोदींकडून ‘या’ मंत्र्यांना नारळ व्हिडिओमध्ये रमनंदीपने स्पष्टपणे म्हटलं आहे कि, “राजीव गांधी यांच्या विद्यमान पुतळ्यांना आम्ही सहन करू शकत नाही आणि गुरसिमरन सिंग मंड असे आणखी पुतळे बसवण्याविषयी बोलत आहेत.” रमनदीप आणि त्याचा साथीदार सतपाल या दोघांविरोधात सलेम टाबरी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय आचारसंहिता कलम 435 (हानी पोहोचविण्याच्या उद्देशाने आग लावणे), आयपीसी कलम 153 ए (शत्रुत्व) आणि आयटी कायदा, मालमत्ता कायद्याच्या कलमांतर्गत नोंदविण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.