मराठी बातम्या /बातम्या /nagpur /मोदी सरकारविरोधातील मोर्च्यात काँग्रेसचे नेते आपसात भिडले, जोरदार खडाजंगी

मोदी सरकारविरोधातील मोर्च्यात काँग्रेसचे नेते आपसात भिडले, जोरदार खडाजंगी

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (bhai jagatap) आणि आमदार झिशांत सिद्दीकी (Zeeshant Siddiqui) यांच्यात जोरदार वादावादी झाली.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (bhai jagatap) आणि आमदार झिशांत सिद्दीकी (Zeeshant Siddiqui) यांच्यात जोरदार वादावादी झाली.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (bhai jagatap) आणि आमदार झिशांत सिद्दीकी (Zeeshant Siddiqui) यांच्यात जोरदार वादावादी झाली.

नागपूर, 14 नोव्हेंबर : महागाईच्या विरोधात शिवसेनेनं (shivsena) औरंगाबाद शहरात आक्रोश मोर्चा काढला होता. त्यानंतर आज काँग्रेसनेही (congress) नागपूरमध्ये मोर्चा काढला होता. पण या मोर्चाच्या सुरूवातीलाच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (bhai jagatap) आणि आमदार झिशांत सिद्दीकी (Zeeshant Siddiqui) यांच्यात जोरदार वादावादी झाली.

नागपूर शहरात काँग्रेसच्या वतीने महागाई आणि बरोजगारीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. पण, मोर्च्यात काँग्रेसचे नेते आपसात भिडले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि आमदार झिशांत सिद्दीकी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या वादाचे कारण ठरले तर राजगृहमध्ये प्रवेश देण्यावरून.

राजगृह इथे काँग्रेसचेच सर्व नेत्यांनी आधी अभिवादन करून मग मोर्चाला सुरूवात केली. पण केवळ 12 जणांची नाव दिली होती आणि तेच नेते आत गेले होते. झिशांत सिद्दीकी यांना ही प्रवेश हवा होता. पण त्यांना तो मिळाला नाही. यावरून आयोजनकर्ते भाई जगताप आणि झिशांत यांच्यात राजगृहाच्या दारातच शाब्दिक चकमक उडाली.

T20 World Cup Final : सहा वर्षांपूर्वीचा बदला घेण्यासाठी न्यूझीलंड सज्ज

युथ काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुरजसिंग ठाकूर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. पण पुढेही झिशांत सिद्दीकी यांना रॅलीसाठी ट्रकवर चढू दिले नाही. तेव्हा त्यांच्या समर्थकांकी जोरदार नारेबाजी केली.

दरम्यान, आम्ही  केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन सुरू केलेल आहे. देशामध्ये भुकबळी, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहे. देशाचा संविधान धोक्यात आलं आहे. या सगळ्या भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

बेपत्ता पत्नी दिसताच तरुणाने स्वत:च पेटून घेतलं; मुंबईतील हैराण करणारं प्रकरण

'जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेश, बिहारमध्ये निवडणुका येतात. तेव्हा तेव्हा महाराष्ट्र राज्य बदनाम करण्याच यांना सुचत असतं इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात. त्रिपुरा राज्यात घडलेली घटना पडसाद महाराष्ट्रात पडत आहे हा भाजपचा जुना प्रयत्न आहे मात्र आता हिंदू आणि मुस्लिम भाजपच्या या जाळ्यात घेणार नाही, असंही पटोले म्हणाले.

First published:
top videos