मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बेपत्ता पत्नी दिसताच तरुणाने स्वत:च पेटून घेतलं; मुंबईतील हैराण करणारं प्रकरण

बेपत्ता पत्नी दिसताच तरुणाने स्वत:च पेटून घेतलं; मुंबईतील हैराण करणारं प्रकरण

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

बेपत्ता पत्नी सापडल्यानंतर एखादा पती आनंदी होईल, मात्र इथं वेगळाच प्रकार घडला.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 14 नोव्हेंबर : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील (Mumbai News) ताडदेव पोलीस स्टेशन हद्दीजवळील 30 वर्षीय व्यक्तीने स्वत:ला रॉकेट ओतून आग (Suicide Attempt) लावण्याचा प्रयत्न केला. तरुणाची पत्नी बेपत्ता झाली होती. मात्र ती सापडल्यानंतर तरुण नाराज झाला. पत्नी सापडल्याची माहिती मिळताच नाराज पतीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. (young man set himself on fire when he saw his missing wife shocking case in Mumbai)

या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तरुणाला नायर रुग्णालयात दाखलं केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण एका कंपनीत डिलिव्हरी बॉय आहे. कोरोना काळात त्याची नोकरी गेली होती. यामुळे तो मानसिक दृष्ट्या त्रस्त झाला होता. बुधवारी त्याची पत्नी अचानक गायब झाली. पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी तो ताडदेव पोलीस ठाण्यात पोहोचला.

हे ही वाचा-मेहुण्यानंच चोरल्या दाजीच्या 2 कार; कारण ऐकून लावाल डोक्याला हात

पती-पत्नीमध्ये सुरू होता वाद...

तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये भांडण सुरू होतं. बुधवारी दोघांचं भांडण झालं आणि त्यानंतर पत्नी अचानक गायब झाली. यानंतर तरुणाने ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तरुणाच्या पत्नीला शोधून काढलं. याबद्दल पोलिसांनी दोघांची चौकशी करावयाची होती. यामुळे पोलिसांनी तरुणाला पोलीस ठाण्यात बोलावलं होतं.

सायंकाळी जेव्हा तरुण जबाब नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला तर तेथे त्याची पत्नी उभी होती. पत्नीला पाहून तरुणाचं स्वत:वरील नियंत्रण सुटलं आणि त्याने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला आग लावली.

First published:

Tags: Crime news, Wife and husband