मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup Final : सहा वर्षांपूर्वीचा बदला घेण्यासाठी न्यूझीलंड सज्ज, हे दोन कांगारू सगळ्यात धोकादायक!

T20 World Cup Final : सहा वर्षांपूर्वीचा बदला घेण्यासाठी न्यूझीलंड सज्ज, हे दोन कांगारू सगळ्यात धोकादायक!

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) न्यूझीलंडचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia vs New Zealand) होत आहे. या सामन्यात केन विलियमसनची (Kane Williamson) टीम 6 वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल.

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) न्यूझीलंडचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia vs New Zealand) होत आहे. या सामन्यात केन विलियमसनची (Kane Williamson) टीम 6 वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल.

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup Final) न्यूझीलंडचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia vs New Zealand) होत आहे. या सामन्यात केन विलियमसनची (Kane Williamson) टीम 6 वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल.

पुढे वाचा ...

दुबई, 14 नोव्हेंबर : 29 मार्च 2015... हा तोच दिवस आहे, जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची (Australia vs New Zealand) टीम वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये समोरा-समोर होत्या. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवून ट्रॉफी जिंकली होती, पण यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाला कोणताच किताब जिंकता आला नाही. न्यूझीलंडची टीम 2019 साली सलग दुसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती, पण तेव्हाही इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये किवी टीमने या पराभवाचा बदला घेतला. आता फायनलमध्ये न्यूझीलंडला 2015 वर्ल्ड कप फायनलचा हिशोब चुकता करण्याची संधी आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला अजूनपर्यंत एकदाही टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup Final) जिंकता आलेला नाही.

न्यूझीलंडची टीम गेल्या काही काळापासून आयसीसी स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करत आहे. 2015 वनडे वर्ल्ड कप फायनल, 2019 वनडे वर्ल्ड कप फायनल, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये विजय, अशा धडाकेबाज कामगिरी किवी टीमने केल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर दबदबा राहिला आहे. 2016 टी-20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकमेव विजय मिळवला.

नॉक आऊटमध्ये धमाकेदार बॅटिंग

ग्रुप स्टेजमध्ये केन विलियमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वात खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या बॉलर्सनी उत्कृष्ट बॉलिंग केली होती. पण सेमी फायनलमध्ये त्यांच्या बॅटरनी वर्ल्ड कप विजयाची दावेदार असलेल्या इंग्लंडला धूळ चारली. मार्टिन गप्टीलचं टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचं रेकॉर्ड चांगलं आहे. गप्टीलसोबत सेमी फायनलमध्ये आपल्या करियरमधली सर्वोत्तम खेळी केलेला डॅरेल मिचेल असेल. मधल्या फळीला जिमी नीशमने सांभाळलं आहे. दुखापतीमुळे डेवॉन कॉनवे खेळू शकणार नाही, न्यूझीलंडसाठी हा मोठा धक्का आहे. त्याच्याऐवजी टीम सायफर्ट मैदानात दिसेल. टीम साऊदी आणि ट्रेन्ट बोल्ट हे अनुभवी फास्ट बॉलर ऑस्ट्रेलियाचे ओपनर एरॉन फिंच (Aron Finch) आणि डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) आक्रमणावर लगाम लावण्यासाठी सक्षम आहेत.

वॉर्नर-मॅक्सवेल धोकादायक

फिंच न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक टी-20 रन करणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. मागच्या दोन इनिंगमध्ये डेव्हिड वॉर्नरनेही आपण फॉर्ममध्ये परतल्याचं दाखवून दिलं आहे. वॉर्नरसोबत ग्लेन मॅक्सवेलही (Glenn Maxwell) किवी टीमसाठी डोकेदुखी ठरू शकतो. पाकिस्तानविरुद्धच्या कामगिरीनंतर मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि मॅथ्यू वेड (Mathew Wade) यांनाही न्यूझीलंड हलक्यात घेणार नाही.

वेडने पाकिस्तानविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये लागोपाठ 3 सिक्स मारून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर एडम झम्पाने (Adam Zampa) स्पर्धेत 10.91 च्या सरासरीने 12 विकेट घेतल्या आहेत. फिंचला फायनलमध्येही झम्पाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. मॅक्सवेलही आपल्या ऑफ स्पिनने टीमला मदत करू शकतो. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जॉश हेजलवूड हे फास्ट बॉलर्स पहिल्यांदाच एकत्र न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मॅच खेळणार आहेत.

ऑस्ट्रेलियन टीम

एरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), एश्‍टन एगर, जॉश इंग्‍लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्वीपसन, एडम झम्पा, जॉश हेजलवूड, मिचेल स्टार्क,पॅट कमिन्स

न्यूझीलंडची टीम

केन विलियमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डॅरेल मिचेल, जिम्मी नीशाम, टॉड एस्टल, ट्रेन्ट बोल्ट, मार्क चॅपमॅन, एडम मिल्ने, काइल जेमीसन, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅन्टनर, टीम सायफर्ट (विकेटकीपर), ईश सोढी, टीम साउदी

First published:
top videos

    Tags: T20 world cup