मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बापाच्या डोळ्यादेखत चिमुकलीनं तडफडून सोडला प्राण; सोलापुरातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

बापाच्या डोळ्यादेखत चिमुकलीनं तडफडून सोडला प्राण; सोलापुरातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

(Photo- shutter stock)

(Photo- shutter stock)

Crime in Solapur: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका सहा वर्षीय चिमुकलीचा वडिलांच्या डोळ्यादेखत दुर्दैवी अंत झाला आहे.

अक्कलकोट, 08 नोव्हेंबर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अक्कलकोट येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका सहा वर्षीय चिमुकलीचा वडिलांच्या डोळ्यादेखत दुर्दैवी अंत (Minor daughter died in front of father) झाला आहे. दिवाळी सणासाठी आजोबांच्या घरी आल्यानंतर चिमुकलीवर काळाने घाला घातला आहे. चिमुकलीला खाऊ आणि खेळणी आणतो म्हणून आजोबा देवदर्शनासाठी गेले असता, पाठिमागे नातीचा जीपच्या धडकेत मृत्यू (Minor girl died in road accident) झाला आहे. ऐन दिवाळी सणाच्या दिवसात चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

श्रेया विठ्ठल चलगेरी असं मृत पावलेल्या 6 वर्षीय मुलीचं नाव आहे. अक्कोलकोट तालुक्यातील संगोगी गावातील रहिवासी असणारे विठ्ठल चलगेरी आपल्या कुटुंबासह दिवाळी सणासाठी वागदरी याठिकाणी आपल्या सासऱ्यांकडे आले होते. जावई विठ्ठल चलगेरी हे चार दिवस आपले सासरे मल्लिनाथ पोमाजी यांच्याकडेच राहणार होते. यामुळे सासरे मल्लिनाथ यांनी आपल्या शेतातील सर्व जबाबदारी जावयावर सोपवून मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती याठिकाणी यात्रेसाठी निघून गेले.

हेही वाचा-हृदयद्रावक! अतिवृष्टीने पिकं सडली;तरुण शेतकऱ्यानं बॅरेजमध्ये उडी घेत संपवलं जीवन

यात्रेतून नातीला खेळणी आणि खाऊ आणतो, असं आश्वासनही त्यांनी आपल्या नातीला दिलं होतं. सासऱ्यांनी शेतातील जबाबदारी सोपवल्याने, 5 नोव्हेंबर रोजी दुपारी जावई विठ्ठल आपल्या 6 वर्षीय लेकीला घेऊन शेतात गेले. शेतात गेल्यानंतर विठ्ठल यांनी आपल्या लेकीला सासूकडे सोडून रस्त्याच्या पलीकडे जनावरांना चारा-पाणी टाकण्यासाठी गेले होते. यावेळी सहा वर्षीय मुलगीही वडिलांच्या मागे धावत येत होती.

हेही वाचा-माळशेज घाटात भीषण अपघात; कार दरीत कोसळून महिलेचा जागीच मृत्यू, 6 जखमी

दरम्यान, रस्त्यावरून सुसाट वेगाने येणाऱ्या जीपने 6 वर्षीय चिमुकलीला जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात विठ्ठल यांच्या डोळ्यादेखत श्रेयाचा तडफडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जीपचालक प्रवीण रेवणसिद्धप्पा डोले याच्याविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Road accident, Solapur