मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्लॉट व्यावसायिकाच्या हत्येचं उलगडलं गूढ; पोटचा लेकच निघाला खुनी, धक्कादायक कारण समोर

प्लॉट व्यावसायिकाच्या हत्येचं उलगडलं गूढ; पोटचा लेकच निघाला खुनी, धक्कादायक कारण समोर

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Murder in Beed: बीड जिल्ह्यातील परळीत नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या जन्मदात्या वडिलांची निर्घृण पद्धतीने हत्या (Father brutal murder by son) केली आहे.

  • Published by:  News18 Desk

परळी, 08 नोव्हेंबर: बीड (Beed) जिल्ह्यातील परळीत (Parali) नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या जन्मदात्या वडिलांची निर्घृण पद्धतीने हत्या (Father brutal murder by son) केली आहे. यानंतर आरोपीनं गुन्हा लपवण्यासाठी वडिलांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा बनाव रचला (plot as suicide) होता. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. आरोपी मुलाचं संशयास्पद वर्तन आणि शवविच्छेदनाच्या अहवालाच्या जोरावर पोलिसांनी ह्या गुन्ह्याची उकल केली आहे. हत्येच्या सात दिवसानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला गजाआड केलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

अजय शांतीलाल लुंकड असं हत्या झालेल्या 50 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते  प्लॉट व्यावसायिक होते. तर सिद्धार्थ अजय लुंकड असं अटक केलेल्या मुलाचं नाव आहे. पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून तपासणी केली असता, आरोपी मुलगा सिद्धार्थ याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आपल्या वडिलांचं आपल्यावर प्रेम नव्हतं, त्यामुळे त्यांची हत्या केली माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा-बापाच्या डोळ्यादेखत चिमुकलीनं तडफडून सोडला प्राण;सोलापुरातील हृदय पिळवटणारी घटना

नेमकं काय घडलं?

1 नोव्हेंबर रोजी प्लॉट व्यावसायिक अजय लुंकड हे आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले होते. अजय यांनी आत्महत्या केली असावी, असं प्रथमदर्शीनी भासत होतं. तसेच आजारपणाला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केल्याचा बनाव मुलाने रचला होता. पण मुलगा सिद्धार्थ याचं एकूणच वर्तन संशयास्पद होतं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत अजय यांनी आत्महत्या केली नसून त्यांची गळा आवळून हत्या केल्याची माहिती वैद्यकीय तपासात समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा-सीमेवर युद्धात दोनदा जिंकले पण नात्यात हारले; लेकानेच माजी सैनिकाला ठेचलं दगडाने

तसेच शनिवारी मृत अजय यांचा मुलगा सिद्धार्थ याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस चौकशी करत असताना, सिद्धार्थच्या जबाबात अनेक तफावती आढळल्या. यामुळे पोलिसांनी त्याच्या प्रश्नांचा भडिमार केला असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. वडील प्रेम करत नसल्याने हत्या केल्याचं देखील त्यानं सांगितलं आहे. आरोपी मुलगा सिद्धार्थ याला पुण्यात कॉम्प्युटर इंजिनिअरींगचं शिक्षण घ्यायचं होतं. पण वडील अजय यांनी त्याला औरंगाबाद येथेच शिक्षणासाठी ठेवलं होतं. त्यामुळे वडील आपल्यावर प्रेम करत नसल्याची भावना त्याच्या मनात तयार झाली होती. यातूनच त्याने आपल्या वडिलांना संपवलं आहे.

First published:

Tags: Beed, Crime news, Murder