नागपुरात मध्यरात्री रंगला खुनी थरार; घराबाहेर बसल्यामुळे गुंडाचा वाजवला गेम

नागपुरात मध्यरात्री रंगला खुनी थरार; घराबाहेर बसल्यामुळे गुंडाचा वाजवला गेम

Murder in Nagpur: मध्यरात्री नागपुरात एका गुंडाच्या हत्येची थरारक घटना समोर आली आहे. घराबाहेर बसल्याच्या रागातून संबंधित गुंड प्रवृत्तीच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

  • Share this:

नागपूर, 06 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून राज्याची उपराजधानी नागपुरात क्राइम रेट वाढतच चालला आहे. दरदिवशी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात हत्येच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. सध्या देशात सर्वत्र दिवाळी सण उत्सहात साजरा केला जात असताना, मध्यरात्री नागपुरात (Nagpur) एका गुंडाच्या हत्येची थरारक घटना समोर आली आहे. घराबाहेर बसल्याच्या रागातून संबंधित गुंड प्रवृत्तीच्या तरुणाची निर्घृण हत्या (Goon's brutal murder) करण्यात आली आहे. यशोधरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

जफर अब्बास बरकत अली असं हत्या झालेल्या गुंडाचं नाव असून तो नागपूर जिल्ह्याच्या कामठी येथील रहिवासी आहे. मृत जफर हा कामठी परिसरातील गुंड असून त्याच्याविरोधात बरेच गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी मध्यरात्री जफर हा आरोपीच्या घरासमोर बसला होता. बराच वेळ घरासमोर बसल्याने आरोपीनं त्याला हटकलं. घरासमोर बसल्याच्या कारणातून दोघांमधील वादाला ठिणगी पडली. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला.

हेही वाचा-मामाच्या गावाला जाताना बहीण-भावावर काळाचा घाला; भाऊबीजेआधीच झाला हृदयद्रावक शेवट

यामुळे संतापलेल्या आरोपीनं जफर याची निर्घृण पद्धतीने हत्या केली आहे. मध्यरात्री घडलेल्या या हत्येच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती यशोधरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृत गुंडाचा मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा-सख्खा भाऊच जीवावर उठला; ऐन दिवाळीत धाकट्यावर कुऱ्हाडीने घाव घालत केला खेळ खल्लास

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी नागपुरात एका कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली होती. एका टोळक्यासोबत झालेल्या वादानंतर संबंधित गुंडाची हत्या करण्यात आली होती. संबंधित गुंडाचं नाव फ्रँक अँथनी असं होतं. फ्रँक हा नागपुरातील कुख्यात गुंड होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात हत्येचे गुन्हे दाखल होते. फ्रॅंकच्या हत्येची घटना ताजी असताना नागपुरात आणखी एका गुंडाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात दहशतीच वातावरण निर्माण झालं आहे.

Published by: News18 Desk
First published: November 6, 2021, 12:05 PM IST

ताज्या बातम्या