हिंगोली, 06 नोव्हेंबर: हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दिवाळीसाठी मामाच्या गावाला जाणाऱ्या बहीण-भावाचा एका भीषण अपघातात (terrible road accident) दुर्दैवी अंत झाला (brother and sister died) आहे. ऐन भाऊबीजेआधी (Bhaubeej) दोघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेनात मृत बहीण-भावाची मोठी बहीण आणि मामा देखील जखमी (uncle and elder sister injured) झाले आहेत. दोन्ही जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आदर्श अरविंद सुरय्या (वय-9) आणि कीर्ती अरविंद सुरय्या (वय-8) असं मृत पावलेल्या दोघां बहीण-भावांची नावं आहेत. तर मृत पावलेल्या मुलांची मोठी बहीण आरती अरविंद सुरय्या आणि मामा राजू खिलारे (वय-24) अशी जखमी झालेल्या मामा-भाचीचं नाव आहे. जखमी मामा राजू खिल्लारे आपल्या तिन्ही भाच्यांना दुचाकीवर घेऊन टाकळगाव येथून वसमतकडे जात होते.
हेही वाचा-चंद्रपुरात 3 शेतकऱ्यांची आत्महत्या; लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच केला हृदयद्रावक शेवट
दिवाळी सणासाठी मामाच्या गावी जाणार म्हणून तिन्ही भाचे खूश होते. पण टाकळगावहून वसमतकडे जात असताना, टाटा एस मॅजिक पिकअपने दुचाकीला जोरदार धडक मारली आहे. सुसाट वेगाने आलेल्या पिकअपने दुचाकीला धडक देताच दुचाकीवर वरील चौघेही घाली कोसळले. मृत आदर्श आणि कीर्तीही रस्त्यावर दूरवर फेकले गेले. हा अपघात इतका भीषण होता की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-अॅटमबॉम्बने घेतला पुण्यातील तरुणाचा जीव; दुर्दैवी घटनेत दिवाळीदिवशीच झाला अंत
तर मामा राजू खिल्लारे आणि मृतांची मोठी बहीण आरती सुरय्या दोघं गंभीर जखमी झाले. आसपासच्या लोकांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं आहे. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ऐन भाऊबीजेच्या आधी बहीण-भावाचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Road accident