Home /News /nagpur /

Nagpur Crime : एका महिन्याने झाला तरुणाच्या हत्येचा उलगडा, मित्रानेच खून करून ढाब्याजवळ पुरलं

Nagpur Crime : एका महिन्याने झाला तरुणाच्या हत्येचा उलगडा, मित्रानेच खून करून ढाब्याजवळ पुरलं

जुन्या भांडणाच्या वादातून तरुणाच्या मित्रांनीच त्याची हत्या केल्याचे या संपूर्ण प्रकरणात उघड झालं आहे. कसा झाला उलगडा?

नागपूर, 02 एप्रिल : नागपूरच्या मौदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिन्यापूर्वी झालेल्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. जुन्या भांडणाच्या वादातून तरुणाच्या मित्रांनीच त्याची हत्या केल्याचे या संपूर्ण प्रकरणात उघड झालं आहे. मृत तरुण 28 वर्षांचा आणि मौदा येथील रहिवासी होता. ही घटना 5 मार्चला घडली होती. त्यानंतर आता महिनाभरानं त्याचा छडा लागला आहे. (friend killed young man) वाचा - छेडछाडीच्या तक्रारीसाठी गेलेल्या वडिलांना पोलिसांनी हकललं, पुढे आक्रीतच घडलं नागपूरच्या मौदा परिसरातील हल्दीराम कंपनीजवळ असलेल्या ढाब्यावर ही घटना घडली आहे. मृत तरुण सुमीत यादव हा या ढाब्यावर काम करत होता. त्याच्या बरोबर घटनेतील मुख्य आरोपी असलेला दीपही याच ढाब्यावर काम करत होता. काही दिवसांपूर्वी सुमीत आणि दीपक यांचे काही कारणावरून वाद झालेले होते. हा वाद नंतर मिटला होता पण, दीपक या संपूर्ण प्रकरणाचा राग मनात धरून होता. त्यामुळं या रागातून आरोपी दीपकने दोन मित्रांच्या सहाय्याने सुमीतला मारण्याचा कट रचला. 5 मार्च रोजी रात्री आरोपी दीपकने त्याच्या दोन मित्रांना ढाब्यावर बोलावले. यावेळी सुमीत झोपलेला असताना दीपक आणि त्याच्या दोन मित्रांनी त्याच्या डोक्यात आणि हाता-पायावर धारदार शस्त्राने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर या तिघांनी  ढाब्याजवळच एक खड्डा करून त्यात सुमीतचा मृतदेह पुरला. त्यानंतर कोणालाही या घटनेबाबत काहीही थांगपत्ता लागला नाही. वाचा - क्रिकेट सामन्यादरम्यान किरकोळ वाद; बॅटनं मारहाण झाल्यानं मोहितचा मृत्यू ढाब्याजवळपच सुमीतचा मृतदेह पुरलेला असल्याने त्या ठिकाणाहून दुर्गंधी यायला सुरुवात झाली होती. त्यानुसार कोणीतरी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी येऊन तपास केला. घटनास्थळी खड्डा खोदून पाहिले असता, त्यात दीपकचा मृतदेह आढळला. त्यानंतर चौकशीत पोलिसांसमोर सर्व घटना उघड झाली आणि पोलिसांनी दीपकसह त्याच्या दोन मित्रांना अटक केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime, Murder, Nagpur

पुढील बातम्या