मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मुलीसोबत झालेल्या छेडछाडीची तक्रार करण्यासाठी गेलेल्या वडिलांना पोलिसांनी हकललं, घरी येताच पायाखालची जमीनच हादरली

मुलीसोबत झालेल्या छेडछाडीची तक्रार करण्यासाठी गेलेल्या वडिलांना पोलिसांनी हकललं, घरी येताच पायाखालची जमीनच हादरली

देहात परिसरात एका छेडछाड झालेल्या मुलीनं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. या मुलीनं फाशी (Girl Commits Suicide) घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.

देहात परिसरात एका छेडछाड झालेल्या मुलीनं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. या मुलीनं फाशी (Girl Commits Suicide) घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.

देहात परिसरात एका छेडछाड झालेल्या मुलीनं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. या मुलीनं फाशी (Girl Commits Suicide) घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.

वाराणसी 02 एप्रिल : उत्तर प्रदेशच्या कानपूर देहात परिसरात एका छेडछाड झालेल्या मुलीनं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. या मुलीनं फाशी (Girl Commits Suicide) घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. तिच्या वडिलांनी छेडछाड करणाऱ्या आरोपींवर आपल्या मुलीच्या हत्येचा आरोप केला आहे. मुलीच्या वडिलांचं असं म्हणणं आहे, की मुलीसोबत झालेल्या छेडछाडीची तक्रार लिहिण्यासाठी ते पोलीस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना ओरडून तिथून बाहेर काढण्यात आलं. जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा मुलीनं फाशी घेतल्याचं त्यांना पाहायला मिळालं.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबीयांचा असा आरोप आहे, की शेजारच्या मुलांनी त्यांच्या मुलीची हत्या केली आहे. घटनेच्या वेळी मुलीचे वडील पोलीस ठाण्यामध्ये शेजाऱ्यांनी आपल्या मुलीसोबत केलेल्या छेडछाडीची तक्रार करण्यासाठी गेले होते.

हे प्रकरण कानपूर देहात ठाण्याच्या राजपूर क्षेत्रातील आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे एका अल्पवयीन मुलीला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप केला जात आहे. हे प्रकरण छेडछाड आणि मारहाणीचं असल्याचं सांगितलं जात आहे. चौदा वर्षीय मुलीचा मृतदेह आपल्या घरात लटकलेल्या अवस्थेत मिळाला. मुलीच्या वडिलांचं असं म्हणणं आहे, की ठाण्यात पोहोचल्यानंतर आपली तक्रार घेण्याऐवजी पोलिसांनी त्यांना हकलून दिलं.

मुलीच्या वडिलांनी सांगितलं, की शेजारी असलेल्या राधेश्यामच्या मुलांनी त्यांचं आयुष्यचं खराब केलं होतं. या मुलांनी या व्यक्तीच्या अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केली. जेव्हा मुलीनं याबाबत तक्रार केली तेव्हा त्यांनी मुलगी आणि तिच्या आईला मारहाण केली. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेले मुलीचे वडील परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्या मुलीचा मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत होता. मुलीच्या वडिलांचा असा आरोप आहे, की आरोपींनीच त्यांच्या मुलीला मारुन तिच्या मृतदेह फासाला लटकवला आहे.

पोलिसांनी पीडितेच्या वडिलांनी केलेली छेडछाडीची तक्रार नोंदवून घेतली नाही. मात्र, तिच्या मृत्यूनंतर रात्रीच एफआयआर दाखल केलं. एसपी केशव चौधऱी यांनी सांगितलं, की मुलीच्या आईनं शेजारी आणि त्याच्या मुलांवर हत्येचा आरोप लावला आहे. पोलिसांनी एका मुलाला अटकही केली आहे. तर, पीडितेच्या कुटुंबीयांचं असं म्हणणं आहे, की पोलिसांनी आधीच ही तक्रार दाखल करुन घेतली असती तर त्यांच्या मुलीचा जीव वाचला असता.

First published:

Tags: Police complaint, Suicide