धर्मशाला, 02 एप्रिल: क्रिकेट (Cricket) खेळून परत येत असताना किरकोळ कारणातून झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलाची बॅटने मारहाण करून हत्या (Murder by beating with bat) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक (Arrest) केली आहे. संबंधित प्रकरणातील 15 वर्षीय मृत मुलाचं (Minor boy death) नाव मोहित असून त्याची क्रिकेटच्या बॅटने बदडून हत्या (Murder) करण्यात आली आहे. मारहाण झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
मृत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मार्च रोजी मृत मोहित आणि त्यांच गावातील तनुज क्रिकेट खेळून परत येत होते. यावेळी कोणत्या तरी कारणावरून त्यांच्या दोघात वाद झाला. यामुळे संतापलेल्या तनुजने आपल्या हातातील क्रिकेट बॅटने मोहितच्या डोक्यात सपासप वार केले. या हल्ल्यात मोहित जागीच बेशुद्ध झाला. तरीही आरोपी तनुज त्याला मारतचं राहिला, त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. आसपासच्या काही लोकांनी मोहितला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. पण त्याची प्रकृती लक्षात घेता त्याला डॉ. राजेंद्र प्रसाद मेडिकल कॉलेज टांडा याठिकाणी हलवण्यात आलं. ही घटना हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कांगडा (kangra) जिल्ह्यातील आहे.
उपचारादरम्यान झाला मृत्यू
जखमी मोहितची प्रकृती गंभीर असल्याचं पाहून डॉक्टरांनी त्याला चंदीगड येथील पीजीआय रेफर केलं. बुधवारी पीजीआय येथे उपचार सुरू असतानाच त्याचं निधन झालं आहे. गुरुवारी शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह घरी आणला आहे. पण दरम्यान मोहितच्या काकूंनीही पोलीस आणि तांडा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितलं की, मृत मोहितचे काका एफआयआरची प्रत घेण्यासाठी नगरोटा सूरियां पोलीस स्टेशनमध्ये गेले असता, तिथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्याशी गैरवर्तन केलं. तसेच तांडा रुग्णालयात वेळेवर रुग्णवाहिका पाठवली नाही.
हे ही वाचा- Pune Crime: लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीचा खून
त्यामुळे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका मोहितच्या काकूने घेतली आहे. याप्रकरणी डीएसपी सिद्धार्थ शर्मा यांनी सांगितलं की, संबंधित आरोपांची चौकशी केली जात असून जे सत्य बाहेर येईल त्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. याप्रकरणी सध्या आरोपीला अटक केली असून पुढील कार्यवाही केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Crime news, Himachal pradesh, Murder