वर्धा जिल्ह्यात कोरोनामुळे नेमके किती मृत्यू? जिल्हा आणि सरकारच्या आकडेवारीत मोठी तफावत

वर्धा जिल्ह्यात कोरोनामुळे नेमके किती मृत्यू? जिल्हा आणि सरकारच्या आकडेवारीत मोठी तफावत

एकाच दिवशीच्या आकडेवारी एवढी तफावत असल्याने नेमकं आकड्यात तफावत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  • Share this:

नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, प्रतिनिधी

वर्धा, 27 एप्रिल: गेल्या एक वर्षांपासून राज्य सरकार (Maharashtra Government) कोरोनाची (Corona) आकडेवारी लपवत असल्याचे आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करीत आहेत. राज्य सरकर तो आरोप खोटा ठरवत असले तरी वर्धा जिल्ह्यात (Wardha District) सरकारी आकडेवारीत तफावत झाल्याचं दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून आज पर्यंतचे मृत्यू 676 सांगण्यात आले. नागपूर विभागाच्या अहवालात 567 तर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) प्रसिद्ध केलेल्या अहवालात वर्धा जिल्ह्याचा मृत्यूचा आकडा फक्त 486 दाखवण्यात आला आहे. एकाच दिवशीच्या आकडेवारी एवढी तफावत असल्याने नेमकं आकड्यात तफावत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वर्धा जिल्हा प्रशासन कोरोनाविषयी गंभीर नसल्याने आरोग्य यंत्रनेचे तीन तेरा वाजले आहेत. कंत्राटी डॉक्टर जिल्हा सामान्य रुग्णालयाची यंत्रणा सांभाळत असून लाखो रूपये वेतन घेणारे फक्त खाजगी रुग्णालय सांभाळण्यात मग्न आहेत. तर सरकार या खासगी डॉक्टरांवर अन्याय करीत गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या डॉक्टरांना पन्नास लाखाच्या विमाचं कवच देत आहे. मात्र कंत्राटी डॉक्टर कोविडमध्ये काम करीत असताना त्यांना या विम्याचा फायदा होणार नाही. उलट त्यांना या योजनेतून बाहेर ठेवलं आहे, असं असताना जिल्हयातील आरोग्य यंत्रणा, विभागातील आरोग्य यंत्रणा व राज्य सरकारातील आरोग्य विभागाच्या वर्ध्याच्या दिलेल्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत आढळून आली. त्यामुळं नेमकं खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतोय हे कळायला मार्ग नाही.

चाचण्यांच्या आकडेवारीतही तफावत

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडून प्रसिद्ध झालेल्या अहवालात 3 हजार 786 चाचण्या झाल्यात. नागपूर विभागाच्या अहवालात 2 हजार 888 चाचण्या झाल्याचे दाखविण्यात आले. राज्य शासनाच्या अहवालात  फक्त 686 चाचण्याची नोंद आहे.

रविवारपर्यंत झालेल्या चाचण्यांत वर्धा जिल्ह्याने 2 लाख 61 हजार 756 दाखविल्या तर नागपूर विभागाने 2 लाख 53 हजार 399 दाखवले आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित वर्धाने 31 हजार 360 आणि नागपूर विभागाने 38 हजार 136 तर राज्य शासनाने 37 हजार 870 दाखवले आहेत.

वाचा: 'कोरोनाला हरवण्याची सुरुवात दिवे पेटवून झाली पण आज आपण मृतदेहाला अग्नी देतोय', काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

कोरोनामुक्त किती?

वर्धा जिल्ह्याच्या आकडेवारीनुसार, रविवारपर्यंत एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 24 हजार 949 इतकी आहे. नागपूर विभागाच्या आकडेवारीनुसार 30 हजार 297 तर राज्य सरकारच्या लेखी 31 हजार 23 कोरोनामुक्त झाल्याची नोंद आहे.

मृतकांची आकडेवारी

रविवारपर्यंत एकूण मृत्यू 676 झाल्याची नोंद वर्धा जिल्हा प्रशासनाकडे आहे. नागपूर विभागाने 567 मृत्यूची नोंद तर राज्य शासनाने फक्त 486  रुग्ण दगावले असे सांगितले आहे.

वर्ध्यात सक्रिय रुग्ण 5 हजार 735 असल्याचं जिल्हा प्रसासनाने म्हटलं आहे तर नागपूर विभागाने 6 हजार 282 ची नोंद असल्याने नेमके कोणते आकडे खरे समजावे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

मृतकांच्या आकड्यात तफावत

20 रोजी वर्धा स्मशानात 30 प्रेत जाळण्यात आले. आरोग्य यंत्रणा जिल्ह्यात मृत्यू फक्त 12 सांगते.

21 रोजी वर्ध्यात 29 प्रेत जाळले तर शासकीय नोंद 12 सांगते

22 रोजी 39 जाळले तर शासकीय नोंद 16 सांगते.

23 रोजी 38 प्रेत जाळले तर शासकीय नोंद 17 सांगते.

24 रोजी 38 प्रेत जाळले तर शासकीय नोंद 31 सांगते.

25 रोजी 36 प्रते जाळले तर शासकीय नोंद 31 सांगते.

Published by: sachin Salve
First published: April 27, 2021, 4:43 PM IST

ताज्या बातम्या