मुंबई, 27 एप्रिल: देशभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाची ही दुसरी लाट (Corona 2nd wave) नाही तर त्सुनामीच असल्याचं पहायला मिळत आहे. दररोज कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे इतकेच नाही तर मृतकांच्या संख्येतही दररोज मोठी वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. यावरुन आता काँग्रेसने (Congress) मोदी सरकार **(Modi Government)**वर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा (Charan Singh Sapra) यांनी एक व्हिडीओ ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. चरणसिंग सप्रा यांनी म्हटलं, “कोरोनाची त्सुनामी हे कुणाचं अपयश? यावर चर्चा होणं गरजेचं आहे कारण, आज देशात औषधे, बेड्स, ऑक्सिजन उपलब्ध नाहीये. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तर काळाबाजार सुरू आहे. जर आज रुग्ण आजारी आहे तर रुग्णालयात जागा नाही आणि मृत झाल्यास स्मशानात जागा नाही. कोरोनाला हरवण्याची सुरुवात दिवे पेटवून झाली होती आणि आज आपण मृतदेहाला अग्नी देत आहोत.”
"कोरोणा की सुनामी - किसकी नाकामी।"
— Charan Singh Sapra (@Charanssapra) April 27, 2021
5 ट्रिलियन की इकोनॉमी की बात करनेवाले लोग ऑक्सीजन उपलब्ध नहीं करापारहे।
मुफ्त टीकाकरण हर भारतीय का अधिकार है। #Resign_PM_Modi #Covid19IndiaHelp pic.twitter.com/jaLGKAJjJN
वाचा: 1 मे पासून 18+ नागरिकांना लस देण्याचे प्रयत्न, ठाकरे सरकारने Serumकडे केल्या ‘या’ दोन मागण्या पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था म्हणणारे ऑक्सिजन देत नाहीत चरणसिंग सप्रा यांनी पुढे म्हटलं, “5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलणारे आज साधारण ऑक्सिजनही रुग्णांना उपलब्ध करुन देत नाहीयेत. यांची लसीकरण मोहिम सुद्धा फेल झाली आहे. दोन डोस आणि पाच किंमती ही नफाखोरी. भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात जेव्हा महामारी आली तेव्हा लसीकरणाचे पैसे घेतले नाहीत. आता पहिल्यांदाच मोदी सरकार लसीकरणात नफाखोरी करु इच्छित आहे. लसीकरण हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे आणि लसीकरण मोफतच झालं पाहिजे. जर आम्हाला मोफत लसीकरण नाही मिळालं तर आम्ही या सरकारचा राजीनामा मागणार.” वाचा: मोफत लसीकरण होणार का? अजित पवारांनी दिले सूचक उत्तर महाराष्ट्रात मोफत लसीकरण? देशभरात 1 मे 2021 पासून कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास 18 वर्षांवरील नागरिक पात्र असणार आहेत. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना करण्यात येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसींचा भार हा राज्य सरकारला उचलायचा आहे. त्यामुळे आता राज्यातील जनतेला मोफत लस देण्यात येणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर बुधवारी (28 एप्रिल 2021) रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भात निर्णय जाहीर करतील.