Home /News /nagpur /

BREAKING : नागपूर रेल्वे स्थानकावर सापडली जिलेटीनने भरलेली बॅग, परिसरात खळबळ

BREAKING : नागपूर रेल्वे स्थानकावर सापडली जिलेटीनने भरलेली बॅग, परिसरात खळबळ


नागपूर रेल्वे स्थानकावर आज रात्री अचानक एक बेवारस लोखंडी पेटी आढळून आली.

नागपूर रेल्वे स्थानकावर आज रात्री अचानक एक बेवारस लोखंडी पेटी आढळून आली.

नागपूर रेल्वे स्थानकावर आज रात्री अचानक एक बेवारस लोखंडी पेटी आढळून आली.

नागपूर, 09 मे : नेहमी गर्दीने गजबजलेल्या नागपूर रेल्वे स्टेशनवर (  Nagpur railway station) जिवंत बॉम्ब सापडल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आणि बॉम्ब नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून बॅग ताब्यात घेतली आहे. या बॅगेत जिलेटिनच्या कांड्या (gelatin stick ) असल्याचे समोर आले आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर आज रात्री अचानक एक बेवारस बॅग आढळून आली. बेवारस बॅग आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आणि बघता बघता बॉम्ब सापडल्याची बातमी वाऱ्या सारखी पसरली. पोलीस स्टेशनवरील रेल्वे पोलिसांनी तातडीने परिसर खाली केला. पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे स्थानकाच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला असलेल्या पोलीस बूथ बाजूला ही बॅग ठेवलेली होती. नागपूर पोलिसांनी तातडीने ही बॅह ताब्यात घेतली. (पतीला जिवंतपणीच मारलं ठार, पत्नीचा कारनामा ऐकून पोलीसही हैराण) विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात जेलेटिन असलेली बॅग सापडली आहे. डॉग स्क्वॉड, BDDS टीम घटना स्थळी पोहचले आहे. बॉम्ब सदृश्य साहित्य सोबत घेऊन गेली आहे. शक्यतो रेल्वेने प्रवास करत असताना ज्वलनशील वस्तू घेऊन जाण्यास सक्त मनाई असते. मात्र, अचानक स्टेशनच्या परिसरात जेलटिनच्या कांड्याने भरलेली बॅग कुणी आणि का ठेवली यामुळे खळबळ उडाली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहे. नागपूरमध्ये झोपडपट्टी जळून खाक, एकापाठोपाठ फुटले 22 सिलेंडर दरम्यान, नागपूरच्या बेलतारोडी परिसरातील महाकाली झोपडपट्टीला आज सकाळला 10 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की, आगीत 35 झोपड्या जळून राख झाल्या असून आगेत  22 घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या आगीत 60 च्या वर झोपड्यातील साहित्य जळून पूर्णपणे राख झाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहे. सुरुवातीला शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा एक अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र जेव्हा अग्निशमन विभागाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली ती धक्कादायक वास्तव पुढे आले. (जादू की झप्पी...; संजय राऊत - अमिषा पटेलचं नेमकं चाललंय तरी काय, Video Viral) महाकाली झोपडपट्टीमध्ये एका इसमाने घराशेजारी कचरा पेटला व कामावर निघून गेला. त्यामुळे सुरुवातीला आगी शेजारी एक घर जळाले त्या आगेत घरच्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि नंतर ती आग संपूर्ण परिसरात पसरली. त्याआगीने संपूर्ण महाकाली झोपडपट्टीला आपल्या विळख्यात घेतले. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहचून एक तासात आग विझली. आगीत महाकाली झोपडपट्टीतील जवळपास 60 च्या वर झोपड्या जळून राख झाल्या. हातावर पोट असणारे अनेक कुटुंबे रस्त्यावर आले. अनेकांच्या स्वप्नाची या आगीने राखरांगोळी केली. त्यामुळे तुमची एक चूक अनेकांच्या आयुष्यावर किती परिणाम करू शकते हे या घटनेतून अधोरेखित झालं.

तुमच्या शहरातून (नागपूर)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या