मुंबई, 9 मे- दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe movie) यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमाचा ट्रेलर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाँच झाला. या सोहळ्याला बॉलिवूड सूपरस्टार अभिनेता सलमान खान, बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल, जॅकी श्रॉफ, रितेश देशमुख, भाग्यश्री पटवर्धन, गुलशन ग्रोव्हर देखील यावेळी उपस्थित होती. यासोबत राजकीय मंडळी देखील उपस्थित होते. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत **(sanjay raut )**आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) यांची भेट झाली. सध्या या दोघांच्या भेटीची सोशल मीडियावर चर्चा तर रंगलीच आहे पण भेटीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अमिषा पटेलनं खासदार संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीचा व्हिडिओ इन्स्टाला शेअर केला आहे. या सोहळ्याला अमिषा पटेल उपस्थित होती. यावेळी प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) बसलेले होते. त्यांना पाहताच अमीषानं त्यांना जादूची झप्पी दिली. सोबत काही कानगोष्टीही झाल्या. या ‘झप्पी’ ची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. वाचा- ‘तो दिवस ठळकपणे आठवतो..’ प्रियांका बर्वेनीं सांगितला ‘चंद्रमुखी’चा अनुभव ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटानंतर प्रविण तरडे (Pravin Tarde) आता हा ‘धर्मवीर’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः प्रवीण करणार आहेत. तर झी स्टुडिओज, साहिल मोशन आर्ट्स आणि मंगेश देसाईंनी या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी उचलली आहे.
अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघेंची भूमिका साकारत असून प्रसादचा पहिला लुकसमोर आल्यापासून चाहते उत्सुक आहेत. ठाण्यातही या सिनेमाचे मोठे पोस्टर लागले आहेत. प्रसाद ओकमध्ये दिघे साहेबांचा भास होत असल्याच्या कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. ट्रेलर लाँचवेळी देखील प्रसाद ओक आनंद दिघेंच्या रुपातच दिसला होता, त्यावेळीही त्याने मान्यवरांकडून प्रशंसा मिळवली.