जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पतीला जिवंतपणीच मारलं ठार, पत्नीचा कारनामा ऐकून पोलीसही हैराण

पतीला जिवंतपणीच मारलं ठार, पत्नीचा कारनामा ऐकून पोलीसही हैराण

 वैतागून परमेश्वर हे पुण्याला निघून गेले होते. नेमकी हीच संधी साधत पत्नी राजश्री हिने पतीची सर्व प्रॉपर्टी हडपण्याचा घाट घातला.

वैतागून परमेश्वर हे पुण्याला निघून गेले होते. नेमकी हीच संधी साधत पत्नी राजश्री हिने पतीची सर्व प्रॉपर्टी हडपण्याचा घाट घातला.

वैतागून परमेश्वर हे पुण्याला निघून गेले होते. नेमकी हीच संधी साधत पत्नी राजश्री हिने पतीची सर्व प्रॉपर्टी हडपण्याचा घाट घातला.

  • -MIN READ
  • Last Updated :

लातूर, 09 मे :  चक्क पती जिवंत असताना त्याच्या पत्नीनं पतीच्या प्रॉपर्टीच्या (Property) हव्यासापोटी नगरपालिकेतून मृत्यू प्रमाणपत्र काढल्याचा धक्कादायक प्रकार लातूर (latur) जिल्ह्यातल्या उदगीर शहरात उघडकीस आला आहे.  नगरपालिकेतून मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी मदत व शिफारस करणाऱ्या माजी नगरसेविका रेखा आपटे व तिचा पती ज्ञानेश्वर आपटे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तर इतर आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदगीर शहरातल्या विकास नगरात राहणारे परमेश्वर केंद्रे आणि पत्नी राजश्री केंद्रे यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. परमेश्वर केंद्रे आणि राजश्री यांच्यामध्ये सतत भांडण होतं होती. त्यामुळे  वैतागून परमेश्वर हे पुण्याला निघून गेले होते.  नेमकी हीच संधी साधत पत्नी राजश्री हिने पतीची सर्व प्रॉपर्टी हडपण्याचा घाट घातला. माजी नगरसेविका रेखा आपटे , तिचा पती ज्ञानेश्वर आपटे आणि अन्य साक्षीदारांच्या मदतीनं उदगीर नागरपालिकेतून तिने पती परमेश्वर केंद्रे यांचं जिवंत असतानाच मृत्यू प्रमाणपत्र काढलं. ( नवरदेवाच्या कपड्यांवरून लग्नात राडा; अक्षता-फुलांच्या वर्षावाऐवजी झाली दगडफेक ) ही बाब परमेश्वर केंद्रे यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी 18 जानेवारी रोजी उदगीर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार उदगीर शहर पोलिसात पत्नी राजश्री सह इतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पोलीस धीम्या गतीनं तपास करत असल्याचा आरोप फिर्यादी परमेश्वर केंद्रे यांनी केला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी माजी नगर सेविकेसह तिच्या पतीला अखेर अटक केली. मात्र अजूनही मुख्य आरोपी असलेली पत्नी राजश्री आणि ईतर आरोपी फरारच आहेत. ( कार्तिक-इशान नाही, सेहवागने T20 World Cup साठी केली या विकेट कीपरची निवड! ) प्रॉपर्टीसाठी वेगवेगळी बनावट कागदपत्रे काढण्याची टोळीच सध्या सक्रिय असल्याचा दावा देखील फिर्यादी परमेश्वर केंद्रे यांनी केला आहे. मात्र जोपर्यंत पत्नी राजश्री पोलिसांच्या हाती लागत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा उलगडा होणं कठीण बनलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात