कहर! फोन काढण्यासाठी टॉयलेटच्या भांड्यात घातला हात, 5 तासांसाठी अडकला

कहर! फोन काढण्यासाठी टॉयलेटच्या भांड्यात घातला हात, 5 तासांसाठी अडकला

टॉयलेटमध्ये फोनवर बोलण्याची तशी अनेकांना सवय असते पण ही सवय कुर्ल्याच्या एका तरुणाला महागात पडली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : टॉयलेटमध्ये फोनवर बोलण्याची तशी अनेकांना सवय असते पण ही सवय कुर्ल्याच्या एका तरुणाला महागात पडली आहे. टॉयलेटमध्ये फोनवर बोलत असताना त्याचा फोन टॉयलेटच्या भांड्यात पडला. तो बाहेर काढण्यासाठी त्याने त्यात हात घातला. पण ते भारतीय पद्धतीचे टॉयलेट असल्याने त्याचा हात त्यात अडकला. अखेर अग्निशमन दलाच्या मदतीने तब्बल 5 तासानंतर त्याचा हात त्या भांड्यातून बाहेर काढण्यात आला.

काल सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. भांड्यात पडलेला फोन काढण्यासाठी त्याने त्यात हात घातला पण हात अडकला होता. त्याने आणि त्याच्या कुटुंबियाने त्याचा अडकलेला उजवा हात बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यांना काही ते शक्य झालं नाही. त्यामुळ नाईलाजास्तव त्यांना अग्निशमन दलाला बोलवावं लागलं.

VIDEO : खड्ड्यांविरोधात मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन

सकाळी 8 वाजता अडकलेला हात अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी चक्क 1 वाजता भांड्याच्या बाहेर काढण्यात आला. रोहित राजभर असं या मुलाचं नाव आहे. तो कॉलेजमध्ये शिकतो. त्याला काही दिवसांआधीच फोन देण्यात आला होता.

काल तो फोनवर बोलत असताना त्याचा फोन टॉयलेटच्या भांड्यात पडला. त्याने तो काढण्यासाठी त्यात हात घातला पण त्याचा हात त्या भांड्यात अडकला होता. त्यामुळे अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. भारतीय पद्धतीचं टॉयलेट असल्यामुळे टॉयलेटच्या भिंती तोडाव्या लागतील असं अग्निशमन दलाने सांगितलं आणि अखेर टॉयलेटच्या भिंती तोडून रोहितचा हात बाहेर काढण्यात आला. दरम्यान यात त्याला जास्त दुखापत झाली नाही.

हेही वाचा...

मनुस्मृतीचा अभ्यास करून आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली-संभाजी भिडे

आंबा खाल्याने पुत्रप्राप्ती होतेच हे कोर्टात सिद्ध करेन-संभाजी भिडे

लज्जास्पद, भारताच्या सुवर्णकन्येची 'गुगल'वर शोधली गेली ‘जात’

First published: July 17, 2018, 10:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading