मुंबई,ता.17 जुलै : तो विशिष्ट आंबा खाल्ला की माणसाची पौरूष शक्ती वाढते आणि त्यामुळे पुत्रप्ताप्ती होते या विधानावर संभाजी भिडे गुरूजी ठाम आहे. गरज पडली तर ही कोर्टात पराव्यानिशी सिद्ध करेन असं आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलं. न्यूज18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी सर्व प्रश्नांना बेधडक उत्तर दिली. त्यांच्या या मुलाखतीमुळे पुन्हा नवं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. आंबा पुराण तो विशिष्ट आंबा खाल्ल्याने माणसी सेक्स पॉवर वाढते. या आंब्यावर ऑस्ट्रेलियात संशोधन झालं आहे. त्यात या आंब्यात ही शक्ती असल्याचं सिद्ध झालं आहे. भारतातही अनेकांनी सशोधन केलं असून त्यातही ती गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यामुळे हे योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. मनुस्मृती मी ज्ञानोबा आणि तुकोबांची मनुबरोबर तुलना केली नाही. माझं भाषण नीट समजून घ्या. राजस्थान हायकोर्टासमोर मनुचा पुतळा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे. ते ताज्य आहे तेवढंच घ्यायचं आणि बाकी सगळं टाकून द्यायचं असं सगळं सुरू आहे. राज्य घटनेवर माझा पूर्ण विश्वास आहे. वारी करणारी 13 वी पिढी वारीची माझ्या घराण्यातली 13वी पिढी आहे. मला वारीत अशांतता निर्माण करायची नव्हती आणि नाही. आमचा धारकरी तसा नाही. केवळ काही लोक अपप्रचार करत आहेत. राजाभाऊ चोपदारांनीही माझी भूमिका समजून घेतली आहे. संभाजी भिडेंची संपूर्ण मुलाखत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







