जाहिरात
मराठी बातम्या / देश / भयंकर! तरुणीवर गँगरेप, युवतीनेही दिली साथ; VIDEO VIRAL झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी दिली अशी प्रतिक्रिया

भयंकर! तरुणीवर गँगरेप, युवतीनेही दिली साथ; VIDEO VIRAL झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी दिली अशी प्रतिक्रिया

भयंकर! तरुणीवर गँगरेप, युवतीनेही दिली साथ; VIDEO VIRAL झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी दिली अशी प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत चार पुरुष आणि एक महिला एका मुलीला त्रास देत होते. सुरुवातीला हा व्हिडीओ जोधपूर आत्महत्या प्रकरणातील आहे, अशी चर्चा सुरू होती. दरम्यान केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांनी या घटनेसंदर्भात ट्वीट केलं आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

कोहिमा, 27 मे: गेल्या अनेक दशकांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. हल्ली क्रुरतेचा कळस गाठत या अत्याचाराचे व्हिडीओ बनवून ते व्हायरल देखील केले जातात. दरम्यान अलीकडे एक व्हिडीओ व्हायरल (Social Media Viral Video) झाला होता, ज्यामध्ये चार पुरुष आणि एक महिला एका मुलीला त्रास देत होते. सुरुवातीला हा व्हिडीओ जोधपूर आत्महत्या प्रकरणातील आहे, अशी चर्चा सुरू होती. दरम्यान केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांनी या घटनेसंदर्भात ट्वीट केलं आहे आणि अपराध्यांना पकडण्यासाठी सर्व राज्यातील पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे असं आवाहन केलं आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू म्हणतात की, ‘ईशान्येकडील मुलीवर  4 पुरुष आणि एका महिलेने बलात्कार आणि अत्याचार केल्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ जोधपूर आत्महत्या प्रकरणाशी संबंधित नाही आहे. मी याप्रकरणी जोधपूरच्या पोलीस कमिशनरांशी बातचीत केली.’ या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी त्यांनी सर्व राज्यातील पोलिसांना आवाहन केले आहे. ते पुढे असं म्हणतात की, ‘या राक्षसांना पकडण्यासाठी सर्व राज्यातील पोलिसांनी सर्व प्रयत्न केलेच पाहिजेत.’

जाहिरात

काय आहे जोधपूर आत्महत्या प्रकरण? काही दिवसांपूर्वी जोधपूरमध्ये आत्महत्येची घटना घडली होती. 23 मे रोजी दिमापूरमधील एका 25 वर्षी नागा महिलेने आत्महत्या केली होती. राजस्थानमधील जोधपूर याठिकाणी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती जोधपूरमध्ये ज्याठिकाणी भाड्याच्या घरात राहत होती, तिथे तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हे वाचा- वंशाचा दिवा नाही तर हवी होती मुलगी, रागाच्या भरात चिमुकल्याची दगडावर आपटून हत्या त्या दरम्यान एका मुलीवर अत्याचार आणि बलात्कार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो या जोधपूरमधील घटनेशी संबंधित असल्याचं सांगत व्हायरल झाला होता. त्यानंतर याप्रकरणी चौकशी केल्यानंतर सत्य समोर आलं. दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि विशेष आयुक्त रॉबिन हिबू आयपीएस यांनी मृताच्या बहिणीने आणि पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हीडिओची पडताळणी केल्याची माहिती दिली. त्यावेळी असं समोर आलं आहे की व्हायरल व्हिडीओतील महिला ही जोधपूमध्ये मरण पावलेली महिला नाही आहे.

आसाम पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे त्या पाच आरोपींचे फोटो माध्यमांमध्ये शेअर केले आहेत. शिवाय त्यांची ओळख पटवणाऱ्यांसाठी बक्षिसही जाहीर केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात