मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुख्यमंत्र्यांच्या वृद्धाश्रमातल्या शिक्षिकेला अखेर दिलासा, मदतीस धावले शिवसैनिक

मुख्यमंत्र्यांच्या वृद्धाश्रमातल्या शिक्षिकेला अखेर दिलासा, मदतीस धावले शिवसैनिक

17 मे रोजी झालेल्या चक्रीवादळात वृद्धाश्रमाचे छप्पर उडाले. एका शिक्षकानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वृद्धाश्रम दुरुस्त करुन देण्याची विनंती केली होती.

17 मे रोजी झालेल्या चक्रीवादळात वृद्धाश्रमाचे छप्पर उडाले. एका शिक्षकानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वृद्धाश्रम दुरुस्त करुन देण्याची विनंती केली होती.

17 मे रोजी झालेल्या चक्रीवादळात वृद्धाश्रमाचे छप्पर उडाले. एका शिक्षकानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वृद्धाश्रम दुरुस्त करुन देण्याची विनंती केली होती.

मुंबई, 27 मे: मुंबईत आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा (cyclone Tauktae) तडाखा अनेक ठिकाणी बसला. या चक्रीवादळाचा फटका वसईतल्या वृद्धाश्रमालाही बसला. 17 मे रोजी झालेल्या चक्रीवादळात या वृद्धाश्रमाचे छप्पर उडाले. यात न्यू लाइफ फाऊंडेशनच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीचं पॅनेल कोसळून एक ज्येष्ठ नागरिक जखमीही झाला. या वृद्धाश्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे शिक्षकही आहेत. त्यापैकीच एका शिक्षकानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वृद्धाश्रम दुरुस्त करुन देण्याची विनंती केली होती. शिक्षिकेनं विनंती करताच शिवसैनिक या वृद्धाश्रमासाठी धावून आलेत. शिवसैनिकांसह अनेक राजकारणी नेते मंडळींनी वृद्धाश्रम दुरुस्त करुन देण्याचं आश्वासन दिलं आहे.

शिवसेनेच्या युवा सेनेनं या वृद्धाश्रमाच्या दुरुस्तीचा खर्च त्याचबरोबर वृद्धांना बेड्स मिळून देण्याचं आश्वासन दिलं आहे. शिवसैनिकांच्या आश्वासनानंतर वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. तौक्ते चक्रीवादळात वृद्धाश्रमाचं खूप मोठं नुकसान झालं. त्यामुळे या वृद्धाश्रमातील वृद्धांना जगणं मुश्किल झालं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे (Suman Laxmikant Randive) यांनी वृद्धाश्रमाचं काम करावं अशी विनंती केली होती. 88 वर्षांच्या सुमन लक्ष्मीकांत रणदिवे या दादर येथील बालमोहन विद्यामंदिर या शाळेतून 1991 साली निवृत्त झाल्या. त्या मुलांना गणित आणि विज्ञान हे विषय शिकावयचे.

हेही वाचा-  JEE Advanced 2021 प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

बुधवारी मिड डेनं दिलेल्या वृत्तानुसार, राजेश आणि सरिता मोरु हे वृद्धाश्रम चालवतात. या पावसात वृद्धाश्रमतील वृद्धांचे बेड्स भिजले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना नीट झोपता ही येत नाही.

मिड डेच्या वृत्तानुसार, तौक्ते चक्रीवादळात न्यू लाइफ फाऊंडेशनची संपूर्ण रचनाच बदलली. मुसळधार पावसात तेथील 29 वृद्धांना तुटलेल्या बेड्सवर झोपायला लागत आहे. ज्यावेळी या वृद्धाश्रमाला भेट दिली. तेव्हा या वृद्धांचे बेड्स आणि कपडे उन्हामध्ये सुकण्यासाठी घातले होते. रणदिवे यांनी आपल्या जुन्या विद्यार्थ्यांकडे हे वृद्धाश्रम लवकरात लवकर व्यवस्थित करण्याची विनंती केली होती. लवकरात लवकर वृद्धाश्रम व्यवस्थित करावं जेणेकरुन आम्हाला रात्रीचं शांतपणे झोपता येईल, अशी विनंती शिक्षिका रणदिवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मिडशी बोलताना रणदिवे यांनी म्हटलं की, या चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचे छप्पर उडाले आहे. आम्ही सगळे वृद्ध असल्यामुळे रात्री झोपायला खूप त्रास होत आहे. मच्छरही खूप चावतात. उद्धव बेटा, मला तुला भेटायचे आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असताना मी तुला शिकवले होते. इथली परिस्थिती खूप खराब झाली आहे. कृपया आम्हाला मदत कर, अशी विनंती मुख्यमंत्र्यांच्या शिक्षकेनं त्यांच्याकडे केली होती.

शिवसेना युवा सेनेचे राहुल कानल म्हणाले, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मला वृद्धाश्रमासाठी सर्वतोपरी मदत करण्यास सांगितले. वृद्धाश्रमासाठी 30 बेड्स, डासांची जाळी आणि छताचे काँक्रीटीकरण करण्याची योजना असल्याचं कानल म्हणालेत. मोरू यांना मी वृद्धाश्रमाच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या कामाचं कोटेशन मिळवून देण्यास सांगितलं आहे. त्यासाठी लागणारा सर्व खर्च आम्ही उचलणार असल्याचं कानल यांनी म्हटलं आहे. रणदिवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याची असल्याचं कानल यांनी सांगितलं.

हेही वाचा- ''माझं नाव सनी, मी बाहेर जाऊ शकतो का?'', प्रश्न विचारणाऱ्याला मुंबई पोलिसांचा हटके रिप्लाय

शिवसेनेचे वसई तालुक्याचे उपाध्यक्ष दिवाकर सिंह आणि त्यांचे सहकारी पंकज देशमुख यांनी बुधवारी वृद्धाश्रमाला भेट देऊन त्याची पाहणी केली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आम्हाला वृद्धाश्रमास भेट देण्यास सांगितलं. तसंच त्यानेही सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वसन दिलं आहे.

गेल्या वर्षी रणदिवे या वृद्धाश्रमात आल्याचं राजेश मोरु यांनी सांगितलं. त्यांच्या पतीचं 2014 साली निधन झालं. माझ्या मुलाचं वयाच्या पहिल्या वर्षी निधन झालं, असं रणदिवेंनी सांगितलं. वृद्धाश्रमात त्यांना टीचर म्हणून अशी हाक मारतात.

First published:
top videos

    Tags: Cyclone, Maharashtra, Mumbai, Uddhav thackeray