• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'मानसिक आजार दूर करण्यासाठी शरीरसंबंध ठेवावे लागतील', YOUTUBE डॉक्टरकडून अजब उपचार

'मानसिक आजार दूर करण्यासाठी शरीरसंबंध ठेवावे लागतील', YOUTUBE डॉक्टरकडून अजब उपचार

(File Photo)

(File Photo)

मानसिक आजार दूर करण्याच्या नावाखाली नागरिकांना लाखोंचा गंडा (Money fraud) घालणाऱ्या वसईतील (Vasai) यूट्यूब डॉक्टर (Youtube doctor) विरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे.

 • Share this:
  वसई, 23 सप्टेंबर: मानसिक आजार दूर करण्याच्या नावाखाली नागरिकांना लाखोंचा गंडा (Money fraud) घालणाऱ्या वसईतील (Vasai) यूट्यूब डॉक्टर (Youtube doctor) विरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. मानसिक आजार दूर करण्यासाठी मुलीला शारीरिक संबंध प्रस्थापित (You have to have sex to get rid of mental illness) करावे लागतील. तसेच मद्यपान करावं लागेल, असे अजब सल्ले दिल्याने संबंधित यूट्यूब डॉक्टरचा भांडाफोड झाला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. नेमकी घटना काय आहे? हैदराबाद येथील रहिवासी असणारे फिर्याद किरणकुमार वांगला यांच्या मुलीला सिझोफ्रेनिया हा मानसिक आजार होता. बरेच वैद्यकीय उपचार करूनही तिला फारसा फरक पडत नव्हता, त्यामुळे ते चिंतेत होते. दरम्यान त्यांना डॉ. कैलास मंत्री यांच्याबाबत माहिती मिळाली. मंत्री यांना अमेरिकेतून पदवी मिळाली असून दहा दिवसांत मानसिक आजार दूर करण्याचा दावा त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवरून केला होता. त्यामुळे फिर्यादी वांगला यांनी मंत्री यांच्याशी संपर्क साधला. हेही वाचा-बहिणीवरील बलात्काराचा घेतला विचित्र बदला; 2 भावंडांकडून आरोपीच्या बहिणीवर गँगरेप मानसिक आजाराची लक्षणं ऐकून घेतल्यानंतर संशयित आरोपी कैलास मंत्री यांने फिर्यादीला पाच लाखांची औषधं दिली. पण त्याने काहीच फरक न पडल्याने त्यांनी मंत्री यांना पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी मंत्री याने फिर्यादी वांगला यांना विरारला बोलवलं. वांगला विमानतळावर आले असता, आरोपीने त्यांच्याकडून पुन्हा तीन लाख रुपये उकळले. त्यानंतर फिर्यादीला मंत्री यांच्या बंगल्यावर घेऊन गेले असता, आरोपीने फिर्यादीला चित्र विचित्र सल्ले द्यायला सुरु केलं. हेही वाचा-धक्कादायक: UBER DRIVER चा महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून जबरदस्ती मंत्री याने मानसिक उपचारासाठी मुलीला मद्यपान करावं लागेल. तसेच बॉयफ्रेंड बनवून शरीर संबंध ठेवावे लागतील असे सल्ले दिले. आरोपीचे सल्ले ऐकून संबंधित डॉक्टर बोगस असल्याचा संशय फिर्यादी वांगला यांना आला. यानंतर त्यांनी तातडीने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्याच्याकडे असलेली डिग्री आणि त्याने आणखी कोणाची अशाप्रकारे फसवणूक केली आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: