Home /News /crime /

धक्कादायक: UBER DRIVER चा प्रवासी महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून केली जबरदस्ती

धक्कादायक: UBER DRIVER चा प्रवासी महिलेवर बलात्कार; कारचे दरवाजे लॉक करून केली जबरदस्ती

उबर ड्रायव्हरने प्रवासी महिलेवर (Uber Driver Raped passenger woman in the car) बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विधानसभेतही याचे जोरदार पडसाद उमटले.

    बंगळुरू, 22 सप्टेंबर : उबर ड्रायव्हरने प्रवासी महिलेवर (Uber Driver Raped passenger woman in the car) बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बंगळुरूमध्ये (Bengaluru) राहणाऱ्या या महिलेवर आपल्या कारमध्येच या ड्रायव्हरने बलात्कार केला आणि तिला कारबाहेर फेकून दिलं. त्यानंतर या महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली असून बलात्कारी ड्रायव्हरला अटक (Rapist driver arrested by police) करण्यात आली आहे. अशी घडली घटना गेल्या काही वर्षांपासून बंगळूरूमध्ये राहणाऱ्या तरुणीने सकाळच्या सुमाराला एक उबर कार बुक केली. एचएसआर ले आऊट ते मुरुगेश पलयापर्यंत प्रवासासाठी ही कार तिने बुक केली होती. या कारमधून प्रवास करत असताना एके ठिकाणी ड्रायव्हरने कार थांबवून दरवाजे लॉक केले आणि तरुणीवर बलात्कार केला. तरुणीने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि झटापटीत ड्रायव्हरचा मोबाईल तरुणीने खेचून घेतला. त्यानंतर ड्रायव्हरने तरुणीला कारबाहेर ढकलून दिले आणि तिथून कार घेऊन पसार झाला. तरुणीचा पवित्रा पाहून आपला मोबाईल घेण्याचं भानही न राहिलेल्या ड्रायव्हरने तिथून पोबारा केला. पोलिसांत तक्रार दाखल या तरुणीने जवळच्याच जीवन बिमा नगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी कारचा क्रमांक, उबेर बुकिंगची तपशील आणि मोबाईल यांच्या आधारे ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही तरुणी मूळची झारखंडची असून बंगळूरुमध्ये एका खासगी कंपनीत ती काम करत आहे. तर बलात्काराचा आरोपी असणारा उबर ड्रायव्हर हा मूळचा आंध्र प्रदेशातील असून गेल्या दोन वर्षांपासून तो बंगळुरूमध्ये राहून कार चालवत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तरुणीने तक्रार करताच सर्व औपचारिकता पूर्ण करून न्यायालयात सादर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हे वाचा - खरंच की काय! साडी नेसल्यामुळे महिलेला रेस्टॉरंटमध्ये नाकारला प्रवेश, पाहा VIDEO विधिमंडळात पडसाद कर्नाटकच्या विधानसभेत या प्रकारामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. सर्व औपचारिकता वेळेत पूर्ण करून आरोपीला कडक शिक्षा दिली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bengaluru, Rape, Taxi Driver

    पुढील बातम्या