• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • बहिणीवरील बलात्काराचा घेतला विचित्र बदला; दोघा भावंडांकडून आरोपीच्या बहिणीवर गँगरेप

बहिणीवरील बलात्काराचा घेतला विचित्र बदला; दोघा भावंडांकडून आरोपीच्या बहिणीवर गँगरेप

File Photo

File Photo

बहिणीवर झालेल्या बलात्काराचा सूड उगवण्यासाठी दोन सख्ख्या भावांनी (Two Brothers) आरोपीच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार (Rape of the accused's minor sister) केला आहे.

 • Share this:
  रीवा, 21 सप्टेंबर: मागील काही दिवसांपासून देशात महिलांविरोधी अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतं आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात एका 30 वर्षीय महिलेवर अमानुष पद्धतीने बलात्कार करून तिची हत्या (Raped and brutal murder) करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना सामूहिक बलात्काराची (Gang rape) आणखी एक घटना उघडकीस आली आहे. बहिणीवर झालेल्या बलात्काराचा सूड उगवण्यासाठी दोन भावांनी (Two Brothers) आरोपीच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार (Rape of accused's minor sister) केला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील गढ येथील आहे. येथील एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने सात महिन्यांपूर्वी बलात्कार केला होता. ही संतापजनक घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत कायदेशीर कारवाई केली होती. संबंधित आरोपी सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. या घटनेच्या सात महिन्यांनंतर पीडितेच्या दोन भावांनी आरोपी तरुणाच्या अल्पवयीन बहिणीवर सामूहिक बलात्कार करून विचित्र प्रकारे बदला घेतला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा-गँगरेपनंतर परभणीतील मुलीची आत्महत्या;मृत्यूपूर्वी भावाला सांगितलं नेमकं काय घडलं आरोपीची 16 वर्षीय बहिणी घरात एकटी असताना, दोन सख्खे भाऊ जबरदस्ती करत घरात शिरले. याठिकाणी आरोपींनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. तसेच जीवे मारण्याची धमकी देत. दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा-मूल होण्यासाठी विवाहितेसोबत अघोरी प्रयोग;कोंबडीचं रक्त पाजून सासऱ्याकडून विनयभंग बहिणीवर झालेल्या बलात्काराचा बदला घेण्यासाठी सूड भावनेनं आरोपींनी हा बलात्कार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. संबंधित दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस जागोजागी छापे टाकत आहेत. दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: