मुंबई, 17 जानेवारी : शिवसेना आणि वंचित बहुजन विकास आघाडीची युतीची चर्चा सुरू आहे. पण, प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विरोध असल्याची टीका केली होती. अखेर यावर राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फॉर्म्युला सुचवला आहे. शिवसेनेनं आपल्या कोट्यातून वंचितला सामावून घेऊ शकते, असा पर्याय सुचवला आहे.
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर युतीची चर्चा रंगली आहे. याच मुद्यावर अजित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.
आता त्यांना वरिष्ठांनी काही सांगितलं असेल तर त्याबद्दल मला काही माहिती नाही. आमची महाविकास आघाडी असली तर काही लोक आमच्यासोबत येण्यासाठी चर्चा करण्यासाठी येतात. काही लोक हे त्या त्या पक्षाच्या कोट्यातून निर्णय घेतात. काँग्रेसला जर निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी त्यांच्या कोटातून निर्णय घ्यावा. शिवसेनेला जो कोटा दिला आहे, त्यांच्या कोट्यातून त्यांनी मित्र पक्षाला सामावून घ्यावं. राष्ट्रवादीने आपल्या मित्रपक्षाला आपल्या कोट्यात सामावून घ्यावं, असं केलं तर अडचणी येणार नाही, असंही अजितदादा म्हणाले.
(कपडे बॅगेत भरून शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख निघाले ACB कार्यालयाकडे, आज होणार चौकशी)
' प्रकाश आंबेडकर हे, का आमच्यावर शंका घेतात हे मला माहीत नाही. पवार साहेब यांनीच ओपन कॅटेगरीमध्ये पाच लोकांना निवडून आणले होते. 1996-98 च्या निवडणुकीमध्ये निवडून आणले. त्यात प्रकाश आंबेडकर होते. आमचे काही निवडून आले होते. आठवले यांच्या पक्षासोबत आमची युती होती. आम्ही त्यांना पंढरपूरमधून निवडून आणले. त्यानंतर त्यांना शिर्डीत उमेदवारी दिली. पण शिर्डीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. पण प्रकाश आंबेडकर आमच्या पक्षाच्या वरिष्ठांबाबत अशी वक्तव्य करतात, पण आम्ही तसे वागत नाही. असं आमचं मत आहे, असा टोलाही अजितदादांनी प्रकाश आंबेडकरांना लगावला.
(sanjay raut : मुख्यमंत्री शिंदेंची दावोसमध्ये मोठी कामगिरी, संजय राऊत म्हणाले...)
'नाशिक पदवीधर गोंधळाचा अंतिम निर्णय उद्या होईल. नाशिकबाबत महाविकास आघाडी बैठक नाही. आमची फोनवर चर्चा सुरू आहे. मुळात नाशिकमध्ये हा काँग्रेस अतंर्गत प्रश्न आहे. उगीच त्यात माहविकास आघाडीला गोवले जाऊ नये. समोर भेटल्यावर कळेल खरे काय झालं. मला कुणकुण लागली होती मी काँग्रेस वरिष्ठ फोन करून सांगितलं होतं, काळजी घ्या आणि डमी फॉर्म भरून घ्या, असा सल्ला दिला होता, असा खुलासाही अजित पवारांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: अजित पवार, प्रकाश आंबेडकर, शिवसेना