मुंबई, 17 जानेवारी : ‘1 लाख 36 हजार कोटींचे उद्योग जर महाराष्ट्रात येत असतील तर स्वागत केले पाहिजे आहे. पण, त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे, अडीच लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती ती आपल्या डोळ्यासमोर निघून गेली. ना मुख्यमंत्री शिंदेंनी प्रयत्न केले, ना उद्योग मंत्र्यांनी प्रयत्न केले, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोसच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरून आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ‘फक्त तीन दिवसांमध्ये 1 लाख 36 हजार कोटींचे उद्योग जर महाराष्ट्रात येत असतील तर स्वागत केले पाहिजे आहे. जर खरोखर हे प्रकल्प येत असतील तर स्वागत करायला हरकत नाही. पण, त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे, अडीच लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती ती आपल्या डोळ्यासमोर निघून गेली. ना मुख्यमंत्री शिंदेंनी प्रयत्न केले, ना उद्योग मंत्र्यांनी प्रयत्न केले, अशी टीका राऊतांनी केली. (Davos World Economic Forum : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दावोसमधील PHOTO) आता दावोसला जागतिक जत्रा भरत असते. ते काही सव्वा लाख प्रकल्प आणणार आहे. ते राज्यात येतील, त्यांची पायाभरणी होईल तेव्हा पाहिले जाईल, असंही राऊत म्हणाले. मी जम्मू काश्मीरला जाणार आहे. तिथे शिख समाजांच्या लोकांशी भेटणार आहे. काश्मिरी पंडित गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहे, त्यांची भेट घेणार आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आहे, त्यामध्ये मी सामील होणार आहे, असंही राऊत यांनी सांगितलं. (shivsena symbol : धनुष्यबाण कुणाचं? निवडणूक आयोगात आज पुन्हा सुनावणी, आजपर्यंत काय घडलं?) शिवसेना कुणाची आहे, हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो. ज्या प्रकारे त्यांनी काय निर्णय दिले त्यावरून काय होतं हे कळलं आहे. शिवसेना कुणाची हा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण होत नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आणि ती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे ती शिवसेना एकच आहे, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







