मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कपडे बॅगेत भरून शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख निघाले ACB कार्यालयाकडे, आज होणार चौकशी

कपडे बॅगेत भरून शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख निघाले ACB कार्यालयाकडे, आज होणार चौकशी

अमरावतीच्या एसीबीच्या कार्यालयात आज चौकशीसाठी शिवसेना आमदार नितीन देशमुख हजर होणार आहे.

अमरावतीच्या एसीबीच्या कार्यालयात आज चौकशीसाठी शिवसेना आमदार नितीन देशमुख हजर होणार आहे.

अमरावतीच्या एसीबीच्या कार्यालयात आज चौकशीसाठी शिवसेना आमदार नितीन देशमुख हजर होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Akola, India

अकोला, 17 जानेवारी : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे आज अमरावतीच्या एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहे. पण यावेळी देशमुख देशमुख चौकशीनिमित्ताने मोठं शक्तीप्रदर्शन करुन रवाना झाले.

अमरावतीच्या एसीबीच्या कार्यालयात आज चौकशीसाठी शिवसेना आमदार नितीन देशमुख हजर होणार आहे. आपल्याला अटक होईल म्हणून या पार्श्वभूमीवर नितीन देशमुख पूर्ण तयारी करून रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांना औक्षण घातले असून आपल्याला अटक होईल या आशायाने त्यांनी कपड़ेही सोबत घेतले आहेत.

(sanjay raut : मुख्यमंत्री शिंदेंची दावोसमध्ये मोठी कामगिरी, संजय राऊत म्हणाले...)

नितीन देशमुख अकोल्यातील त्यांच्या कार्यालयातून अमरावतीकडे प्रयाण केलं आहे. त्यांनी त्यांच्या सोबत कपडे आणि सामान सामान घेतले आहे. अकोल्यातून जवळपास ७०० कार्यकर्ते देशमुखांसोबत अमरावती इथे रवाना झाले आहे.

(shivsena symbol : धनुष्यबाण कुणाचं? निवडणूक आयोगात आज पुन्हा सुनावणी, आजपर्यंत काय घडलं?)

दरम्यान, आज अशी मानसिकता निर्माण केली की, अमरावतीचे एसीबी कार्यालयात हजर झाल्यानंतर आपल्याला अटक करतील, त्यानंतत आत टाकतील त्या हिशोबाने तयारीलाच लागलो, म्हणून आज घरून कपडे घेऊन सोबत चाललोय. कारण की, हुकूमशाहीच्या पद्धतीने सरकार चालू आहे, इंग्रजापेक्षा हे खराब लोक आहेत, असा आरोप देशमुख यांनी बोलताना केला आहे.

उद्धव ठाकरे शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांना लाच लुचपत प्रतिबंध कार्यालयाने उघड चौकशी संबंधी जबाब नोंदविण्यासाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. आज 17 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. नितीन देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदारसंघाचे आमदार आहेत. नितीन देशमुख यांच्यावर बेहिशेबी संपत्ती असल्याची तक्रार काही महिन्याधी करण्यात आली होती. नितीन देशमुख यांनी संपत्तीची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र अमरावती येथे सुरू आहे. त्यांना जबाब नोंदविण्याकरिता ही नोटीस बजावण्यात आली आहे. देशमुख यांना १७ जानेवारीला सकाळी 11 वाजता अमरावती येथील अपर पोलीस अधिक्षक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे उपस्थित राहण्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं होतं.

First published:
top videos