जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / VIDEO: प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या करत घरात पुरला मृतदेह, 6 वर्षाच्या मुलीनं केला घटनेचा खुलासा

VIDEO: प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या करत घरात पुरला मृतदेह, 6 वर्षाच्या मुलीनं केला घटनेचा खुलासा

VIDEO: प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या करत घरात पुरला मृतदेह, 6 वर्षाच्या मुलीनं केला घटनेचा खुलासा

मुंबईतील (Mumbai) महिलेनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा गळा चिरुन हत्या (Murder) केली. यानंतर तिनं मृतदेहाचे चार तुकडे करुन ते स्वयंपाकघरात पुरले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 02 जून : मुंबई (Mumbai) उपनगरातील दहिसर पूर्वच्या खान कंपाउंड येथून एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचा खुलासा एका सहा वर्षाच्या चिमुकलीनं केला आहे. तिच्या आईनं मुलीसमोरच आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या (Murder) केली. घटनेच्या 11 दिवसानंतर मुलीनं दिलेल्या माहितीवरुन दहिसर पोलिसांनी (Police) तिच्या वडिलांचा मृतदेह घराच्या स्वयंपाकघरातून खोदून बाहेर काढला. नवऱ्याच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे, तर तिचा प्रियकर सध्या फरार असल्याचं सांगितलं जात आहे. उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये रईस शेखचं 2012 मध्ये शाहिदा नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं. लग्नानंतर हे दोघंही दहिसर पूर्वच्या खान कंपाउंडमध्ये भाड्याच्या घरात राहात होते. रईस दहिसर पूर्व, रेल्वे स्टेशनच्या जवळच असणाऱ्या एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. तर, त्याची पत्नी सहा वर्षाची मुलगी आणि अडीच वर्षाच्या मुलासोबत घरीच असायची. याच काळात शेजारी राहाणाऱ्या अनिकेत उर्फ अमित मिश्रासोबत तिचे विवाहबाह्य संबंध सुरू झाले. ही गोष्ट रईसला समजली तेव्हा त्यानं या गोष्टीला विरोध केला. पतीचा रोजचा विरोध शाहिदाला नकोसा झाला होता, त्यामुळे तिनं आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला.

जाहिरात

अकरा दिवसाआधी शाहिदा आणि अमित अनैतिक संबंध ठेवत असतानाच अचानक रईस घरात आला. यावेळी दोघांनीही घरात असलेल्या चाकून रईसचा गळा कापला. याचदरम्यान सहा वर्षाची चिमुकली आपल्या अडीच वर्षाच्या मुलासोबत घरात आली. तेव्हा आईनं तिला धमकी दिली, की कोणाला काही सांगितल्यास तिलादेखील वडिलांप्रमाणेच मारुन जमिनीत पुरेल. खान कंपाउंडमध्येच राहाणाऱ्या रईसच्या एका मित्रानं तो बेपत्ता असल्याची तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात दिली. दुसरीकडे शाहिदानं आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या शरीराचे चार तुकडे करत त्याचा मृतदेह स्वयंपाकघरात पुरला आणि त्याचा मोबाईल आपल्याजवळ ठेवला.

स्वयंपाक करताना सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू तर सात गंभीर जखमी गोंडामधून घरच्यांचा फोन आल्यास शाहिदा सांगायची की रईस न सांगताच कुठेतरी निघून गेला आहे. शेवटी तीन दिवसांआधी गावाहून रईसचा भाऊ खान कंपाउंडमधील रईसच्या घरी पोहोचला. याचवेळी संधी मिळताच सहा वर्षाच्या मुलीनं आपल्या चुलत्याला आईच्या विवाहबाह्य संबंधांबद्दलची सगळी माहिती दिली. यानंतर त्यानं पोलीस ठाणं गाठत पोलिसांनी ही सगळी घटना सांगितली. अखेर पोलिसांनी स्वयंपाकघरातील जमिनीत पुरलेला चार तुकड्यांचा मृतदेह बाहेर काढला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात