मराठी बातम्या /बातम्या /देश /

स्वयंपाक करताना गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू तर सात गंभीर जखमी

स्वयंपाक करताना गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू तर सात गंभीर जखमी

स्वयंपाक करत असताना सिलेंडरचा स्फोट झाल्यानं दोन घरं जमीनदोस्त झाल्याची घटना समोर आली आहे. यातील आठ जणांचा मृत्यू झाला (8 People Died in Cylinder Blast) आहे. तर, सात जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 02 मे : स्वयंपाक करत असताना सिलेंडरचा स्फोट झाल्यानं दोन घरं जमीनदोस्त झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोन्ही घरातील पंधरा लोक यामध्ये अडकले होते. यातील आठ जणांचा मृत्यू झाला (8 People Died in Cylinder Blast) आहे. तर, सात जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गोंडा (Gonda) जिल्ह्यातील वजीरगंज ठाण्याच्या परिसरातील टिकरी गावात घडली आहे. जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थली अजूनही एक लहान मुलगा अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

आतापर्यंत 2 महिला, 2 पुरुष आणि 4 लहान मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, या घटनेत जखमी झालेल्या सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. टिकरी गावातील नुरूल हसन यांच्या घरामध्ये अचानक स्फोट झाला. यात शेजारी असलेलं घरही जमीनदोस्त झालं. घटनेत दोन्ही घरं जमीनदोस्त झाली.

खासगी रुग्णालयात कोरोना उपचाराचे दर निश्चित; तुमच्या शहरात किती शुल्क पाहा

या घटनेची माहिती मिळताच आयजी देवीपाटन रेंज, पोलीस अधीक्षक, एएसपी आणि अनेक ठाण्यांमधील फोर्स घटनास्थली दाखल झाली. यानंतर घटनास्थळावरुन आठ लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. एसपी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मदत आणि बचावकार्य सुरू आहे. अद्यार स्फोटाचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. मात्र, स्फोटाचा स्तर पाहाता काहीही अंदाज लावणं कठीण आहे. फॉरेंसिक टीमदेखील घटनास्थळी दाखल झाली आहे.

एसपी संतोष मिश्रा यांनी न्यूज 18 सोबत बातचीत करताना सांगितलं, की डायल 112 वर सूचना मिळाली, की स्वयंपाक बनवताना स्फोट झाल्यानं घर कोसळलं आहे. घटनास्थळी पोहोचून पोलीस आणि प्रशासन टीम रेस्क्यू करत आहे. आठ लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सात जणांवर उपचार सुरू आहेत.

First published:

Tags: Accident, Uttar pradesh