• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Mumbai Alert! लोकल ट्रेनमध्ये होणार Gas Attack?, गुप्तचर यंत्रणांचा इशारा

Mumbai Alert! लोकल ट्रेनमध्ये होणार Gas Attack?, गुप्तचर यंत्रणांचा इशारा

Mumbai local trains: दहशतवादांकडून नवनवे खुलासे होत आहे. या दहशतवाद्यांच्या षडयंत्रबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.

  • Share this:
    मुंबई, 18 सप्टेंबर: नवी दिल्लीत (delhi) सहा दहशतवाद्यांना अटक (6 terrorists arrested in Delhi) केली. त्यानंतर आता या दहशतवादांकडून नवनवे खुलासे होत आहे. या दहशतवाद्यांच्या षडयंत्रबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दहशतवादांचा मोठ्या घातपाताचा कट होता. मुंबई (mumbai) आणि उत्तर प्रदेशमधील निवडणुका (Elections in Uttar Pradesh) दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होतं, असंही समजतंय. त्यातच मुंबई लोकलही दहशतवाद्यांच्या निशाणावर होतीच मात्र रेल्वेत विषारी वायू (gas attacks) सोडून घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता, अशी धक्कादायक माहिती सुत्रांनी दिली आहे. अटक करण्यात आलेले दहशतवादी इतर ठिकाणांव्यतिरिक्त मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये स्फोट घडवण्याचा कट आखत होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याविषयी गुप्तचर माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारे दहशतवाद्यांनी लोकल ट्रेनवर गॅस हल्ला किंवा गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकावर भरधाव गाडी घुसवून प्रवाशांना चिरडण्याचं षडयंत्र आखलं आहे. मुंबईत महिला लसीकरण विशेष सत्र, Walk In येत लाखभर महिलांनी घेतला लाभ तसंच रेल्वे पोलिसांना (GRP) विविध एजन्सींकडून नवीन धमक्या येत असून त्याआधारे ही माहिती मिळाली आहे. रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद म्हणाले, ''आम्हाला वारंवार दहशतवादाच्या धमक्या येत आहेत. विशेषत: लोकल ट्रेनसाठी आलेली धमकी तसंच आम्ही प्रत्येक धमकी गंभीरपणे घेतली गेली आहे. आम्ही आलेल्या धमक्यांवर विशेष लक्ष देऊन विविध पावले उचलत आहोत.'' दहशतवादांकडून मुंबई लोकलची रेखी दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी पार पडलेल्या बैठकीत अतिरिक्त सुरक्षा वाढवण्याचं ठरवण्यात आलं आहे. सुरक्षेसाठी एक मॉडल तयार करण्याक येणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. अनेक ठिकाणांची रेकी गेल्या महिन्याभरापासून हे ऑपरेशन सुरू होतं. 6 दहशतवाद्यांपैकी मुंबईतून एका जणाला अटक करण्यात आली होती. ऐन सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युपीमध्ये IED ब्लास्ट करण्याचा कट होता. धक्कादायक म्हणजे या दहशतवाद्यांनी मुंबई लोकलचीही रेकी केली होती. तसंच घातपात घडवण्यासाठी त्यांनी राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन रेकी केल्याचंही समजतंय. मोठी बातमी: विराट कोहलीला BCCI देणार आणखी एक धक्का, सर्वात मोठा 'शत्रू' येणार परत लोकल ट्रेनच्या सुरक्षेसाठी उभारणार नवं मॉडल दरम्यान अटक करण्यात आलेला दहशतवादी मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करुन दिल्लीला जात असल्यानं मुंबई लोकलच्या सुरक्षेबाबत सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. बुधवारी या पार्श्वभूमीवर आरपीएफचे आयुक्त जितेंदर श्रीवास्तव, रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद आणि मध्य रेल्वेचे विभागीय संचालक शलभ गोयल यांच्यात एक महत्वाची बैठकही पार पडली. या बैठकीत मुंबई लोकलच्या सुरक्षेबाबत अॅक्शन प्लान तयार करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेवरही चर्चा झाली आहे. मुख्य म्हणजे या बैठकीत लोकलच्या सुरक्षेबाबत एक नवीन मॉडेल तयार करण्यात येणार आहे. जान मोहम्मद आणि त्याचा साथीदार गोल्डन टेंपल या ट्रेननं प्रवास करुन दिल्लीला जात होते. तपास यंत्रणांनी त्यांना ट्रेनमध्येच पकडलं. मात्र त्याच्या साथीदाराला पकडण्यात यश आलं नाही. या कारवाईनंतर राज्यातील सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे. सर्व यंत्रणांकडून काम सुरु आहे. दहशतवादी कनेक्शनशी संबंधित मोठी बातमी, प्रयागराजमध्ये आणखी एकाला अटक सध्या मुंबई लोकल आणि स्थानकांवर बॉम्ब शोधक पथक, सीसीटीव्ही, बॅग स्कॅनर मशीन आणि रँडम चेकिंगद्वारे सुरक्षा देण्यात येत आहे. या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ केली जाईल. तसंच ही यंत्रणा अद्ययावत करण्यात येईल,असं जितेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितलं.
    Published by:Pooja Vichare
    First published: