मुंबई, 23 ऑगस्ट : राज्यात कोरोनाची तिसरी लाट (corona Third Wave) येणार अशी भीती एकीकडे वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे, राज्य आता कोरोना हद्दपार (maharashtra corona cases today) होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कारण, कोरोनातून बरे होण्याचे (corona patient Recovery Rate) प्रमाण हे 97 टक्क्यांवर पोहोचले आहे. तसंच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा 50 हजारांच्या खाली आली आहे.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रासाठी आज समाधानाची बातमी दिली आहे. आज राज्यात ६,७९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,३८,७९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०५% एवढे झाले आहे.
टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई इथे नोकरीची संधी; इथे करा अप्लाय
तसंच, आज राज्यात ३,६४३ नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर १०५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच, आज राज्यात ४९,९२४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % इतका आहे. सध्या राज्यात ३,०२,८८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
तिसऱ्या लाटेला घाबरण्याचे कारण नाही - टोपे
तर दुसरीकडे, दुसरी लाट (Second Wave) आता नियंत्रणात आली आहे. मात्र आता देशात तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. निती आयोगाने (Niti Ayog)हा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिसऱ्या लाटेसाठी राज्याची तयारी पूर्ण असल्याचं राजेश टोपे म्हणाले.
नीती आयोगाचा अलर्ट आजचा नसून केंद्राला आलेलं पत्र जून महिन्यातलं असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. राज्याला सद्यस्थितीत कोणताही अलर्ट किंवा इशारा दिलेला नसल्याचं ते म्हणाले. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकारची तयारी पूर्ण झाली असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Covid cases