• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • ...अन् 2 बहिणींनी आपलं काळीजच काढून दिलं; रक्षाबंधनानिमित्त भावाला आयु्ष्याची भेट

...अन् 2 बहिणींनी आपलं काळीजच काढून दिलं; रक्षाबंधनानिमित्त भावाला आयु्ष्याची भेट

2 बहिणींनी वाचवला भावाचा जीव.

2 बहिणींनी वाचवला भावाचा जीव.

दोन बहिणींनी आपल्या आजारी भावाला सर्वात मोठं रक्षाबंधन गिफ्ट दिलं आहे.

 • Share this:
  लखनऊ, 23 ऑगस्ट : रक्षाबंधन (Raksha bandhan) म्हणजे बहिणी-भावाच्या (Sister brother) अतूट नात्याचा दिवस. भाऊ बहिणीला रक्षणाचं वचन देतो. तर बहीण भावाच्या आयुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीला गोड गिफ्ट देतो. अशा या रक्षाबंधनाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमधील (Uttar pradesh) बहिणींनी आपल्या भावाला आयुष्याची भेट दिली आहे. दोघींनीही आपलं काळीज काढून भावाला दिलं आहे (Sisters donate liver to brother). उत्तर प्रदेशच्या बदायूमधील 14 वर्षांच्या अक्षतला त्याच्या दोन्ही मोठ्या बहिणींनी रक्षाबंधनचं मोठं गिफ्ट दिलं.  22 वर्षांची प्रेरणा आणि 29 वर्षांच्या नेहाने त्याला आपलं यकृत दान करून त्याचा जीव वाचवला आहे. 14 मे रोजी अक्षतची तब्येत अचानक बिघडली. सुरुवातीच्या तपासणीत त्याला कावीळ असल्याचं निदान झालं. त्यानुसार उपचार झाले. पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर त्याला मेंदाता रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं तपासणीत त्याचं लिव्हर फेल झाल्याचं समजलं. हे वाचा - काय म्हणावं हिला! 23 वर्षे घालतेय एकच अंडरविअर; कंजूसपणाची हद्दच केली ना राव अक्षतचं वजन 93 किलो होतं. त्याच्या पोटात पाणी भरलं होतं आणि सूज आली होती. त्यामुळे त्याचा त्रास खूप वाढला होता. लवकरात लवकर त्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे यकृत प्रत्यारोपण करण्याची गरज होती. आज तकच्या रिपोर्टनुसार मेदांता रुग्णालयातील पीडियाट्रिक लिव्हर डिसीज अँड ट्रान्सप्लांटेशनच्या डॉक्टर नीलम मोहन  यानी सांगितलं की, अक्षतला जेव्हा आणण्यात आलं, तेव्हा त्याचे रिपोर्ट पाहूनच तो खूप गंभीर स्थितीत असल्याचं निदान झालं. दोन तीन दिसवांत लिव्हर ट्रान्सप्लांट झालं नाही तर त्याच्या जीवाला धोका वाढला असता. कुणाचं तरी यकृत दान होऊन ते यकृत मिळेल आणि त्यानंतर ते अक्षतला देता येईल इतका वेळही त्याच्याकडे नव्हता. त्यामुळे कुटुंबाने त्याच्या कुटुंबातील कुणीतरी यकृत दान करावं, असं सांगितलं. अक्षतच्या दोन्ही मोठ्या बहिणी त्याचा जीव वाचवण्यासाठी धावून आल्या. दोघींनी आपल्या यकृताचा अर्धा अर्धा भाग आपल्या भावाला दिला. हे ऑपरेशन खूप आव्हानात्मक होतं. ट्रान्सप्लांट करताना लिव्हरचं वनज रुग्णाच्या शरीराच्या कमीत कमी 0.8%,  1% असावं.  जर आम्ही एका बहिणीचं लिव्हल घेतलं असतं, तर त्याचं वजन फक्त 0.5 ते 0.55% होतं. त्यामुळे आम्हाला दोन्ही बहिणींचं लिव्हर घ्यावं लागलं, असं डॉ. ए एस सोइन यांनी सांगितलं. हे वाचा - पावसाळ्यात वाढवा Immunity,पळतील आजार; असा असावा आहार कदाचित हे भारतातील नव्हे तर जगातील पहिलं प्रकरण असावं, जिथं दोन वेगवेगळ्या डोनरच्या लिव्हरचा भाग जोडून एक लिव्हर बनवून ट्रान्सप्लांट करण्यात आलं आहे. गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात हे ऑपरेशन झालं आहे. 15 तास हे ऑपरेशन सुरू होतं. आठवडाभर या तिघांच्याही प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आलं. आता तिघांचीही प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
  Published by:Priya Lad
  First published: