Home /News /mumbai /

औरंगाबादमधील सभेनंतर राज ठाकरेंवर कारवाई? पोलीस महासंचालकांनी केलं मोठं वक्तव्य

औरंगाबादमधील सभेनंतर राज ठाकरेंवर कारवाई? पोलीस महासंचालकांनी केलं मोठं वक्तव्य

औरंगाबादमधील सभेनंतर राज ठाकरेंवर कारवाई? पोलीस महासंचालकांनी केलं मोठं वक्तव्य (फाईल फोटो)

औरंगाबादमधील सभेनंतर राज ठाकरेंवर कारवाई? पोलीस महासंचालकांनी केलं मोठं वक्तव्य (फाईल फोटो)

Maharashtra DGP Rajnish seth press conference: राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

    मुंबई, 3 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. तसेच मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर 4 मे पासून मशिदींसमोर भोंगे लावण्यात येईतल असा स्पष्टच इशारा दिला. औरंगाबाद पोलिसांकडून (Aurangabad Police) राज ठाकरेंच्या सभेला अटी-शर्थींसह परवानगी दिली. या सभेत राज ठाकरेंनी नियमांचं उल्लंघन केलं आहे का? याबाबत औरंगाबाद पोलिसांनी एक अहवाल तयार केला आहे. त्याच दरम्यान आज राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Maharashtra DGP Rajnish Seth) यांनी एक मोठं विधान केलं आहे. काय म्हणाले पोलीस महासंचालक? राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेच्या संदर्भात विचारले असता त्यांनी म्हटलं, औरंगाबाद पोलीस आयुक्तानी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास केला आहे. कारवाई करण्यास औरंगाबाद पोलीस आयुक्त सक्षम आहेत. आवश्यक असल्यास औरंगाबाद पोलीस योग्य ती कारवाई करतील. वाचा : राज ठाकरे यांच्या विरोधात शिराळा कोर्टाकडून वॉरंट, अटक होणार? आवश्यक वाटल्यास राज ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली आहे. जर आवश्यक असेल तर जी काही कारवाई आवश्यक असेल ती आज संध्याकाळपर्यंत होईल असंही पोलीस महासंचालकांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंवर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यास पोलीस दल सक्षम आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन जनतेला करण्यात येत आहे. कुठल्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. सामाजित एकोपा अबाधित ठेवण्यासाठी बैठका घेण्यात आल्या आहेत. राज्यात एसआरपीएफ आणि होमगार्ड संपूर्ण राज्यात तैनात केले आहे. 15 हजार नागरिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण पोलीस दल रेडी मोडमध्ये आहे आणि जो कुणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कऱण्याचा प्रयत्न करेल त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी म्हटलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Maharashtra police, MNS, Raj Thackeray

    पुढील बातम्या