जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर पोलीस महासंचालकांचा इशारा, "कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर कठोर करावाई"

राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर पोलीस महासंचालकांचा इशारा, "कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर कठोर करावाई"

पोलीस महासंचालकांची पत्रकार परिषद LIVE

पोलीस महासंचालकांची पत्रकार परिषद LIVE

Maharashtra DGP Rajnish Seth press conference: राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 मे : राज्याचे पोलीस महानिरीक्षक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद (Maharashtra DGP Rajnish Seth press conference) घेतली. पत्रकार परिषदेत पोलीस महानिरीक्षकांनी म्हटलं, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बैठक झाली. कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यास पोलीस दल सक्षम आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन जनतेला करण्यात येत आहे. कुठल्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. सामाजित एकोपा अबाधित ठेवण्यासाठी बैठका घेण्यात आल्या आहेत. राज्यात एसआरपीएफ आणि होमगार्ड संपूर्ण राज्यात तैनात केले आहे. 15 हजार नागरिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण पोलीस दल रेडी मोडमध्ये आहे आणि जो कुणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कऱण्याचा प्रयत्न करेल त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी म्हटलं आहे. वाचा :  राज ठाकरेंचं शिवाजी महाराजांबद्दलचे वक्तव्य इतिहासाला धरुन नाही : संभाजीराजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी 4 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जर मशिदींवरील भोंगे उतरले नाही तर मनसेकडूनही मशिंदींसमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याची भूमिका घेतली. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यासोबतच औरंगाबाद येथील सभेला पोलिसांनी अटींसह परवानगी दिली होती. या संदर्भात औरंगाबाद पोलिसांनी पोलीस महासंचालकांना अहवाल दिला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil), राज्याचे पोलीस महानिरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर आता राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या विरोधात घेतलेली भूमिका आणि त्यासोबतच दिलेल्या अल्टिमेटम नंतर वातावरण चांगलेच तापले आहे. या एकूणच परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांनी विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. लाऊडस्पीकरवरुन सुरू असलेल्या वादात कुठलाही राजकीय पक्ष, संघटना रस्त्यावर उतरु नये यासाठी पोलिसांकडून योग्य ती पावलं उचलण्यात येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात