मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /घटस्फोटापूर्वी बायकोनं फोडलं नवऱ्याचं बिंग, पोलिसांना दिली अशी माहिती की, नवरा झाला फरार

घटस्फोटापूर्वी बायकोनं फोडलं नवऱ्याचं बिंग, पोलिसांना दिली अशी माहिती की, नवरा झाला फरार

Kalyan Crime News - केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर कोरे वोटर आयडी कशासाठी आणले गेले होते. त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता. याचा तपास पोलिस करत आहेत.

Kalyan Crime News - केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर कोरे वोटर आयडी कशासाठी आणले गेले होते. त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता. याचा तपास पोलिस करत आहेत.

Kalyan Crime News - केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर कोरे वोटर आयडी कशासाठी आणले गेले होते. त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता. याचा तपास पोलिस करत आहेत.

कल्याण, 3 जून : कल्याणमध्ये (Kalyan) एका पत्नीनं पतीचं असं बिंग फोडलं की, त्याला पोलिसांपासून लपत फिरावं लागत आहे. घरात कोरे वोटर (Blank Voter ID) आयडीकार्ड पडलेले होते. ते पती घेऊन जाणार होता. पण त्याआधीच पत्नीनं ही माहिती पोलिस (Police) आणि तहसीलदारांना देत पतीनं बिंग फोडलं. पोलिसांनी गुन्हा नोंद करत या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. या पती-पत्नीमध्ये वाद सुरू असून त्यांनी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे.

(वाचा-कोपरगाव : सहा महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न, विहिरीत आढळला विवाहितेचा मृतदेह)

कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल अशा माधव संसार या इमारतीमध्ये राहणाऱ्या कामेश मोरे आणि कृतिका मोरे या पती पत्नीमध्ये वाद सुरू आहेत. त्याच्या घटस्फोटाची प्रक्रियाही सुरू आहे. या दरम्यान एकदिवस कामेश मोरे यानं मुलाला फोन करून त्याच्या बेडरूममध्ये ठेवलेले वोटर आयडी कार्ड म्हणजे मतदान ओळखपत्र काढून ठेवायला सांगितलं. काही वेळानं कामेश ते घेऊन जाणार होता. मुलानं काढलेले ते मतदान ओळखपत्र पाहून पत्नीला धक्काच बसला. त्याचं कारण म्हणजे ते सर्व मतदान कार्ड हे कोरे होते. पती नक्की काहीतरी चुकीचं करत असल्याची जाणीव कृतिका यांना झाली.

(वाचा-गजब ! मुंबईत पोलिसानंच लुटलं ज्वेलर्स मालकाला, तब्बल 1.25 कोटींचा गंडा)

कृतिका यांनी यानंतर जराही वेळ न घालवता लगेचच खडकपाडा पोलिस आणि कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना फोन केले. घरात मोठ्या संख्येनं कोरे वोटर आयडी कार्ड असल्याचं कळताच नायब तहसीलदार वर्षा थळकर टीम तिथं पोहोचल्या. एवढे सारे कोरे मतदान ओळखपत्रं पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. कोऱ्या कार्डसह काही दुसऱ्या तालुक्याचे कार्डही होते. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करत ते जप्त केले. या प्रकारानंतर कामेश मोरे फरार असल्याचं समोर आलं आहे.

हाय प्रोफाईल सोसायटीचत राहणाऱ्या व्यक्तीनं कोरे वोटर आयडी कुठून आणि कशासाठी आणले. त्याचा कोणाला फायदा होणार आहे. या कृत्यात कामेश मोरे सोबत कोण आहे. या प्रश्नाचे उत्तर कामेश मोरे याच्या अटकेनंतर समोर येणार आहे. खडकापाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर कोरे वोटर आयडी कशासाठी आणले गेले होते. त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता. याचा तपासही पोलिस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Kalyan