मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मुंबईत पोलिसानंच केली ज्वेलर मालकाची फसवणूक, तब्बल 1.25 कोटींचा गंडा

मुंबईत पोलिसानंच केली ज्वेलर मालकाची फसवणूक, तब्बल 1.25 कोटींचा गंडा

मुंबईतल्या भायखळा (Byculla) भागात पोलिसानं (Mumbai Police constable) च ज्वेलरची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मुंबईतल्या भायखळा (Byculla) भागात पोलिसानं (Mumbai Police constable) च ज्वेलरची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मुंबईतल्या भायखळा (Byculla) भागात पोलिसानं (Mumbai Police constable) च ज्वेलरची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मुंबई: मुंबईतल्या भायखळा (Byculla) भागात पोलिसानं (Mumbai Police constable) च ज्वेलरची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल 1 कोटी 25 लाखांची फसवणूक (cheating)केल्याप्रकरणी पोलिसांनी एका पोलिसासह तीन जणांना अटक केली आहे.

खलील कादर शेख (47), त्याचे साथीदार रविंद्र कुंचिकुर्वे (36), संतोष नकटे (27) अशी आरोपींची नावं असून त्यातील एक जण लालबाग परिसरातल्या एका ज्वेलरच्या दुकानातील मॅनेजर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सोमवारी संध्याकाळी भायखळा पोलीस कॉलनीजवळ ज्वेलर्सचे मालक भरत जैन (56) त्यांच्या साथीदारांसह दुचाकीवरुन सोन्याचे बार वितरीत करण्यासाठी जात होते. मात्र ते जात असताना त्यांना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अडवलं. त्यातल्या एकानं पोलिसांचा गणवेश घातला होता. आरोपींनी जैन यांची गाडी अडवल्यानंतर त्यांच्या साथीदाराला गाडीचे कागदपत्रे दाखवण्यास सांगितलं.

हेही वाचा- मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण होणार? आज डोमिनिका न्यायालय देणार निकाल

आरोपींपैकी एक जण कागदपत्र तपासत असताना दुसर्‍या आरोपीनं त्यांच्याकडील सोन्याचे बार असलेली बॅग हिसकावली आणि पळून गेला. या सर्व प्रकारानंतर जैन आणि त्यांचा सहकारी यांनी भायखळा पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनमध्ये जैन यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला.

गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने याची चौकशी सुरू केली होती. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेल्या दोन वाहनांच्या नंबर प्लेटची तपासणी केली. यानंतर पोलिसांनी संशयितांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यात नायगाव मधील स्थानिक शस्त्रे युनिट पोलीस हवालदार शेख यांचा समावेश होता. तपास केल्यानंतर संपूर्ण घडलेला प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा- 'बाप' काढणं महापौरांना पडलं महागात, ट्वीट डिलीट पण स्क्रीन शॉट व्हायरल

आरोपींकडून पोलिसांनी दोन दुचाकी, चार मोबाइल फोन आणि 1,045 ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Mumbai crime branch, Mumbai Poilce