अहमदनगर, 03 जून : कोपरगाव तालुक्यामध्ये पढेगाव परिसरात एका विहिरीमध्ये विवाहितीचा मृतदेह आढळल्यामुळं (Deadbody of Newly Mariied Girl) खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वीच या तरुणीचं लग्न झालं होतं. एकिकडं तरुणीनं आत्महत्या केल्याचं सांगितलं जात असताना, तिच्या माहेरच्यांनी मात्र सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केल आहेत. त्यामुळं आता या प्रकरणी पोलिस सर्व बाजुंनी तपासाला लागले आहेत.
(वाचा-गजब ! मुंबईत पोलिसानंच लुटलं ज्वेलर्स मालकाला, तब्बल 1.25 कोटींचा गंडा)
पुजा सागर मापारी या 24 वर्षीय तरुणीचा मृतदेह गुरुवारी सकाळी कोपरगाव तालुक्यातील पढेगाव परिसरात असलेल्या विहिरीत आढळला. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुजा हिचं लग्न सहा महिन्यांपूर्वीच झालं होतं. पण अचानक तिच्या मृत्यूमुळं संशयाचं वाचावरण निर्माण झालं आहे. पुजानं आत्महत्या केली असल्याच्या चर्चांनाही उधाण आलेलं आहे, मात्र तिच्या माहेरच्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. उलट त्यांनी या प्रकरणी पुजाच्या सारच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच या प्रकरणात कोणतंही पत्र, चिठ्ठी देखिल आढळलेली माहिती अद्याप नाही.
(वाचा-दिल्ली पोलिसांना धक्का, सुशील कुमारबाबत कोर्टानं फेटाळली मागणी)
सहा महिन्यांपूर्वी पुजा हिचा विवाह झाला होता. पण तिच्या सासरच्या लोकांनी वारंवार पैशाची मागणी केल्याचा आरोप पुजाच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. पैशाची मागणी करत तिच्यावर अनेकदा मानसिक आणि शरीरिक छळ झाल्याची तक्रारही तिच्या माहेरच्या लोकांनी केली आहे. त्यामुळं आमच्या मुलीने आत्महत्या केली नसुन तिचा घातपात केल्याचा आरोप सासरच्या लोकांवर त्यांनी केला आहे.
या प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर करक शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी या सर्व घटनेची माहिती घेतली असून, मृत्यू नेमका कसा झाला, आत्महत्या आहे की घातपात याचा तपास घेण्यास सुरुवात केली आहे.
कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Crime news